'या' भारतीय महिला क्रिकेटरने वयाच्या 31 व्या वर्षी घेतली निवृत्ती

भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज व्ही.आर वनिताने (VR Vanita) वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
VR Vanita
VR VanitaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian women's cricket team) धडाकेबाज फलंदाज व्ही.आर वनिताने वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मिडियावरील ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा केली. तिने ट्विटरवर एक निवेदन जारी करुन भारताच्या दोन दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि मिताली राज (Mithali Raj) यांचे आभारही मानले आहेत. वनिताने 2014 ते 2016 पर्यंत भारतासाठी सहा एकदिवसीय आणि 16 टी-20 सामने खेळले आहेत. (VR Vanita has retired from international cricket at the age of 31)

दरम्यान, वनिताने जानेवारी 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मिताली आणि झुलन व्यतिरिक्त, तिने आपले कुटुंबींय, मित्र, मार्गदर्शक आणि टीममेटचे आभार मानले. याशिवाय तिने कर्नाटक आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचेही आभार मानले आहेत.

VR Vanita
IPL 2022 आधीचं धोनीचा करोडपती गोलंदाज आला चर्चेत

वनिताने ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ''मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 19 वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मी लहान मुलगी होते, जिला खेळाची आवड होती. आजही माझे क्रिकेटवरील प्रेम कायम आहे. परंतु त्याची दिशा बदलली आहे. माझे मन म्हणते खेळत राहा, पण माझे शरीर मला थांबायला सांगते. त्यावर मी शरीराचे ऐकायचे ठरवले आणि निवृत्ती घेण्याचे निश्चित केले."

असे सुरु झाले करिअर

वनिताने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत सहा सामन्यांत 85 धावा केल्या. याशिवाय 16 टी-20 सामन्यात तिने 216 धावा केल्या आहेत. 2021-22 देशांतर्गत हंगामात, वनिता बंगालने महिला वरिष्ठ वनडे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यामध्ये तिने 225 धावा केल्या. आंध्र प्रदेशविरुद्ध तिने 61 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर 71 चेंडूत 107 धावा केल्या. तिने या स्पर्धेत 100 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com