Valpoi News : पिसुर्ले-शांतीनगरात वटवृक्षाखाली ‘पुष्पवैभव’चे प्रकाशन

Valpoi News : १५० औषधी वनस्पतींची माहिती ः ‘विवेकानंद फौज’चे सूर्यकांत गावकर यांचा उपक्रम
Vivekananda Environment Awareness Force Valpoi
Vivekananda Environment Awareness Force ValpoiDainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, केरी-सत्तरीचे सदस्य सूर्यकांत गावकर यांनी लेखन केलेले गोमंतकातील निवडक १५० औषधी वनस्पतींची सचित्र माहिती संकलित केलेले १६० पानांचे रंगीत ‘पुष्पवैभव’चे प्रकाशन १४ रोजी पिसुर्ले शांतीनगर येथे जोगेश्वर वडाच्या झाडाखाली सायंकाळी करण्यात आले.

विवेकानंद पर्यावरण जागृती फौज केरीतर्फे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, लोककला अभ्यासक पौर्णिमा केरकर, दीपक गावस, लेखक सूर्यकांत गावकर उपस्थित होते.

अनिल सामंत म्हणाले, सूर्यकांत यांनी अगदी मेहनतीने या वैविध्यपूर्ण अशा पुस्तकाचे लेखन केले आहे. प्रत्येक वनस्पतीची माहिती त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मांडली आहे.

प्रत्येक झाडाचे महत्त्व, उपयोग, संस्कृती नाते, प्रत्येक फुलांचे वर्णन, त्याचे वेगळेपण, कोणत्या ऋतूत फुले येतात, औषधी गुणधर्म इत्यादी माहिती या पुस्तकात मांडली आहे. अर्जुन आवळा, औदुंबर, रूई या सारख्या झाडाचे महत्त्व, झाडात होणारे बदल, साध्या सरळ शब्दात मांडले आहे.

दीपक गावस म्हणाले, पर्यावरण हा विषय मुलांमध्ये रुजावा यासाठी विवेकानंद संस्था काम करीत आहे. शाळेत पर्यावरणीय शिबिर घेतली जातात. त्यातून मुलांना बरीचशी माहिती मिळत आहे. गावकर यांनी वनौषधींचे लेखन करून समाजात वेगळी प्रतिमा तयार केली आहे.

सूर्यकांत गावकर म्हणाले, गावोगावची मंदिरे, झाडे, फुले, फुलपाखरे, पक्षी, डोंगर, धबधबे, मोठे दगड, दऱ्या-खोऱ्या अशा अनेक ठिकाणची छायाचित्रे टिपत गेलो.

फुलांविषयी माझे आकर्षण वाढतच गेले. त्यामुळे माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले. त्या दिवसापासून मी मिळेल, त्यावेळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री एकटाच फिरून फुलांचे फोटो काढण्याचा ध्यासच धरला आणि जवळपास ३५० विविध रान फुलांची छायाचित्रे काढली. त्यानंतर जवळपास १२०० च्यावर रान फुलांची छायाचित्रे दिवस-रात्र काम करून संग्रहित केली आहेत. सूत्रनिवेदन विठ्ठल शेळके यांनी केले तर स्वाती गावकर यांनी आभार मानले.

Vivekananda Environment Awareness Force Valpoi
Goa News : गोव्याची ओळख गुन्ह्यांची राजधानी ! कॅ. विरियातो फर्नांडिस

मातीबद्दलची आत्मीयता

पौर्णिमा केरकर म्हणाल्या, आपल्या मातीतील औषधी सुगंध समाजापर्यंत पोचविला आहे. मातीबद्दलची आत्मीयता कृतीतून दिसून आली आहे. केवळ छायाचित्रांबरोबरच विस्तृत माहिती संकलन केली आहे.

औषधी गुणधर्म, फुले कुठे मिळतात, वेगळेपणा, कोणत्या झाडांची आहेत. त्याचे लेखन फार सुंदरपणे केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com