Virender Sehwag: 'व्याजासकट परत करणं, हाच मार्ग...', पाकिस्तानबद्दलच्या ट्वीटवर टीका करणाऱ्यांना सेहवागचं उत्तर

Virender Sehwag Tweet: विरेंद्र सेहवागने पाकिस्तानबद्दल ट्वीट केल्यानंतर झालेल्या टीकेवर उत्तर दिले आहे.
Virender Sehwag
Virender Sehwag
Published on
Updated on

Virender Sehwag opened up on his Tweet about Pakistan Exit from ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतात होत असलेला वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता शेवटाकडे आली आहे. अशात आता सर्वांनाच उपांत्य फेरीचे वेध लागले आहे. 9 नोव्हेंबरला न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केल्यानंतर पाकिस्तानच्या आशांना धक्का बसला होता.

याचदरम्यान 10 नोव्हेंबर रोजी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने एक ट्वीट केले होते, ज्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता त्याने त्याने ट्वीट करण्यामागील स्पष्टीकरण दिले आहे.

त्याने 10 नोव्हेंबरला बाय बाय पाकिस्तान लिहिलेला फोटो पोस्ट करताना त्यावर 'पाकिस्तान जिंदाभाग! मायदेशात सुरक्षित जा' असे कॅप्शन लिहिले होते. त्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली होती.

यावर आता 11 नोव्हेंबर रोजी सेहवागने उत्तर लिहिले की '21 व्या शतकात 6 वनडे वर्ल्डकप झाले आहेत. या 6 स्पर्धांमध्ये फक्त 2007 साली आपण उपांत्य फेरीत पोहचलो नव्हतो, पण बाकी पाचही वेळी आपण उपांत्य सामन्यात पोहचलो. दुसरीकडे पाकिस्तानने 6 पैकी केवळ 2011 साली एकदा उपांत्य फेरी गाठली.'

'ते आयसीसी आणि बीसीसीआयवर चेंडू आणि खेळपट्टी बदलण्यासारखे आरोप लावत आहेत. पाकिस्तानला हरवल्यानंतरही आपण दुसऱ्या टीमकडून हरल्यानंतर त्यांचे प्रधानमंत्री आपली थट्टा करतात.इथे पोहचल्यानंतर त्यांचे खेळाडू आपल्या सैनिकांची मस्करी करण्यासाठी हैदराबादमध्ये चहा पितानाचे फोटो टाकतात.

'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कॅमेऱ्यात आपल्या देशाला दुश्मन म्हणतात. आणि ते आता तिरस्काराच्या बदल्यात प्रेमाची अपेक्षा करत आहेत. जे उपदेश करतात, त्यासाठी दोन मार्ग असतात.'

'जो चांगला वागेल त्याच्याबरोबर आपण खूप चांगले आहोत, आणि जो असं वागेल, तेव्हा योग्य वेळी व्याजासकट सर्व परत करणे, हाच माझा मार्ग आहे, मैदानातही आणि मैदानाबाहेरही.'

'व्याजासकट परत करणं, हाच मार्ग...', पाकिस्तानबद्दलच्या ट्वीटवर टीका करणाऱ्यांना सेहवागचं उत्तर

सेहवागच्या या पोस्टवरही चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर 11 नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी त्यांनी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 8 साखळी सामने खेळले, त्यातील 4 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला, तर 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com