Rakesh Jhunjhunwala: शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने हा एका युगाचा अंत असल्याचे म्हटले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.आकासा एअरच्या उद्घाटन समारंभात ते शेवटचे सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते.
राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर सेहवागने ट्विट केले की, 'स्टॉक मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले.त्याच्या कुटुंबिय आणि प्रियजनांबद्दल संदभावना व्यक्त करतो.' राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
शेअर बाजारापर्यंत पोहोचण्याचा प्रवास
राकेश झुनझुनवाला गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि त्यांच्या प्रवासामुळे अनेकांना शेअर बाजारातून पैसे कमवण्याची प्रेरणा मिळाली. अनेकजण त्यांना जाणतात किंवा नकळत त्यांना आपला गुरू मानतात, पण झुनझुनवाला कोणाला आपला गुरू मानत हे तुम्हाला माहीत आहे का? राधाकिशन दमानी हे राकेश झुनझुनवाला यांचे गुरू होते. भारतातील काही सेल्फ मेड अब्जाधीशांपैकी दमानी एक आहे. दमाणी यांनीही हर्षद मेहता घोटाळ्याच्या वेळी शॉर्ट सेलिंग करून भरपूर पैसा कमावला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.