Suryakumar Yadav: शतकवीर सूर्याचे विराटकडूनही स्पेशल कौतुक, पाहा कशी दिली रिऍक्शन

सूर्यकुमारने शतक केल्यानंतर विराट कोहलीने स्पेशल रिऍक्शन दिली आहे.
Virat Kohli reacts on Suryakumar Yadav's 3rd T20I century
Virat Kohli reacts on Suryakumar Yadav's 3rd T20I centuryDainik Gomantak

India vs Sri Lanka: गुरुवारी राजकोटला झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 91 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारताला हा विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादवने मोलाची कामगिरी बजावली.

Virat Kohli reacts on Suryakumar Yadav's 3rd T20I century
Suryakumar Yadav: भारताच्या 'मिस्टर 360'ला 'बेबी एबी'कडून शिकायचाय 'तो' स्पेशल शॉट, पाहा व्हिडिओ

विराट कोहलीने केले सूर्यकुमारचे कौतुक

सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यांत 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमारने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याच्या या शतकामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 228 धावा उभारल्या होत्या.

सूर्यकुमारचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय टी20 शतक ठरले आहे. त्याचे त्याच्या शतकाबद्दल भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केले आहे. विराटला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

विराटने इंस्टाग्राम स्टोरीला सूर्यकुमारचा फोटो पोस्ट केला असून त्यावर दोन फायर इमोजी आणि दोन टाळ्या वाजवतानाच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.

(Virat Kohli reacts on Suryakumar Yadav's 3rd T20I century)

सूर्यकुमारनेही विराटच्या या स्टोरीला रिप्लाय दिला आहे. त्याचा रिप्लाय देतानाचे फोटोही सध्या व्हायरल झाले आहेत.

सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तीन शतके करणारा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4 शतके केली आहेत.

भारताने जिंकली मालिका

भारताने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 16.4 षटकात सर्वबाद 137 धावाच करता आल्या. दरम्यान, तिसरा टी20 सामना या मालिकेतील निर्णायक सामना होता.

कारण भारताने मुंबईला झालेला पहिला सामना 2 धावांनी जिंकला होता, तर दुसरा सामना श्रीलंका संघाने 16 धावांनी जिंकला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यानंतर मालिका विजेत्याचा निकाल लागणार होता. अखेर भारताने तिसरा सामना जिंकत मालिकेवर कब्जा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com