Virat Kohli React on his Career ahead of India vs Sri Lanka Match in ICC ODI Cricket World Cup 2023:
भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली शानदार कामगिरी करत आहे. त्याने या स्पर्धेत एक शतकही ठोकले आहे. आता तो 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, आता अनेक चाहते विराटच्या 49 व्या वनडे शतकाची वाट पाहात आहेत. विराटने आत्तापर्यंत वनडेत 48 शतके केली आहेत. त्यामुळे त्याला सचिनच्या सर्वाधिक 49 व्या वनडे शतकाच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी एका शतकची गरज आहे.
विराटने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 88.50 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. दरम्यान असे असले तरी आपले करियरच्या योजना आधीच आखता येत नसल्याचे विराटने म्हटले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट म्हणाला, 'जर आपण क्रिकेटबद्दल बोलत असू, तर मी कधीही हा विचार केला नाही की मी हे मिळवेल, जशी आत्ता माझी कारकिर्द आहे आणि ईश्वर मला इतक्या कालावधीची कारकिर्दीचा आणि कामगिरीचा आशिर्वाद देईल.'
'मी या गोष्टी करण्याचे स्वप्न पाहिले, पण कधीही या गोष्टी कशा होतील याचा विचार केला नव्हता. ज्याप्रकारे तुमचा प्रवास होईल, गोष्टी कशा घडतील, याबद्दल कोणीही योजना आधीच आखू शकत नाही. मी कधीही हा विचार केला नव्हता की मी इतक्या वर्षात इतकी शतके करेल आणि इतक्या धावा करेल.'
तसेच विराटने असेही सांगितले की त्याचे लक्ष नेहमीच संघाच्या यशात योगदान देण्याकडे राहिले आहे.
त्याने सांगितले की 'माझे लक्ष याकडेच असते की मी संघासाठी चांगली कामगिरी केली पाहिजे आणि संघाला कठीण परिस्थितीतूनही जिंकून द्यायला पाहिजे. त्यासाठी मी माझ्या लाईफस्टाईलमध्येही काही बदल केले. माझ्याकडे नेहमीच लय होती, पण प्रोफेशनॅलिझम नव्हते.'
'आता माझा एकमेव फोकस हा मला खेळ कसा खेळायचा आहे यावर असतो आणि त्यानंतर त्याप्रकारे खेळून मिळालेल्या परिणामावर. खेळ मेहनतीला ओळख देतो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मी माझ्या कारकिर्दीतून हेच शिकलो आहे.'
'मी माझे 100 टक्के देऊन माझे क्रिकेट खेळलो आहे आणि त्यातून मला जे मिळाले तो आशिर्वाद होता. मी हे सर्व अशाप्रकारे होईल हा विचारच केला नव्हता.'
दरम्यान, कोहलीने आत्तापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 513 सामने खेळले असून 53.96 च्या सरासरीने 26121 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.