Virat Kohli
Virat KohliTwitter / @H1League

Virat Kohli: '...या देशातील महिला हॉकीपटूही विराटच्या 'जबरा फॅन'

Virat Kohli With Female Hockey Players: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे.
Published on

Virat Kohli With Female Hockey Players: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात तुफान फटेबाजी करत आहे. आतापर्यंत त्याने T20 विश्वचषक-2022 मध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. प्रत्येक वेळी टीम इंडियाच्या विजयात त्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. दरम्यान, विराटने ऑस्ट्रेलियात महिला हॉकीपटूंची भेट घेतली. त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये त्याच्यासोबत अनेक महिला हॉकीपटू दिसत आहेत.

विराटने हॉकीपटूंची भेट घेतली

दरम्यान, विराटने अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या हॉकीपटूंची भेट घेतली. हॉकी वन लीगच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन गुरुवारी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये विराट हॉकीपटूंसोबत दिसत आहे. या फोटोचे कॅप्शन असे आहे की, 'अ‍ॅडलेड फायर आणि एचसी मेलबर्न यांच्यातील सामन्यापूर्वी अ‍ॅडलेडमध्ये कोण आहे ते पाहा. विराट कोहलीला (Virat Kohli) पाहून आनंद झाला.'

Virat Kohli
Virat Kohli: कोहलीच्या रुमचा व्हिडिओ लीक करणाऱ्याला पडकडले, हॉटेलची मोठी कारवाई

विराट उत्कृष्ट फॉर्ममध्ये

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82, नेदरलँडविरुद्ध नाबाद 62 आणि बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) नाबाद 64 धावांची खेळी केली.

Virat Kohli
Virat Kohli श्रीमंत किकेटपटुंच्या यादीत दुसऱ्या स्थानी

पुढचा सामना मेलबर्नला होणार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आता झिम्बाब्वेचा सामना करावा लागणार आहे (IND vs ZIM), जो मेलबर्नमध्ये खेळला जाईल. या सामन्यासाठी टीम इंडियाही मेलबर्नला पोहोचली आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारताने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचे 6 गुण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com