IND vs AFG: विराट कोहली गोल्डन डकवर आऊट, 14 वर्षात पहिल्यांदाच 'हे' घडलं

Virat Kohli Golden Duck, IND vs AFG 3rd T20: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना बंगळुरु येथे खेळवला जात आहे.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Golden Duck, IND vs AFG 3rd T20: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना बंगळुरु येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने वेगवान सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकात संघाला दोन मोठे धक्के बसले. टीम इंडियाचा सर्वात सफल फलंदाज विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. तो गोल्डन डकचा बळी ठरला आणि त्याच्या 14 वर्षांच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अशाप्रकारे बाद झाला. गेल्या सामन्यात त्याने 16 चेंडूत 29 धावांची खेळी केली होती. फरीद अहमदने त्याची विकेट घेतली.

दरम्यान, विराट कोहलीने 2010 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो 117 सामने खेळला आहे आणि 14 वर्षांत प्रथमच गोल्डन डकवर आऊट झाला आहे. त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही 109 वी इनिंग होती. एकूणच, या फॉरमॅटमधील हे त्याचे पाचवे गोल्डन डक ठरले. पण या फॉरमॅटमध्ये तो पहिल्यांदाच गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

Virat Kohli
IND vs AFG: सॅमसन, कुलदीपला मिळणार संधी? शेवटच्या T20I सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

दुसरीकडे, विराट कोहलीच्या नावावर 117 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51.7 च्या सरासरीने 4037 धावा आहेत. तो जगभरात T20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याच्या नावावर 37 अर्धशतके आणि एक शतक आहे. या सामन्यात विराटने 6 धावा केल्या असत्या तर तो भारतासाठी 12 हजार टी-20 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला असता. पण तो हे करु शकला नाही. आता त्याची संघात निवड झाल्यास तो थेट टी-20 विश्वचषक 2024 मध्ये या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.

Virat Kohli
IND vs AFG: ...तर रोहित कॅप्टनकूल धोनीचा विक्रम मोडेलच, पण भारताचा सर्वात यशस्वी T20 कर्णधारही ठरणार

दरम्यान, या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने 5 व्या षटकापर्यंत 22 धावांत चार विकेट गमावल्या. या सामन्यात फरीद अहमदला संधी मिळाली आणि त्याने यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, संजू सॅमसन यांना बाद केले. अजमतुल्ला उमरझाईने शिवम दुबेची विकेट घेतली. विराटप्रमाणेच संजू सॅमसनही गोल्डन डकवर आऊट झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com