Virat Kohli: 'आमची आई पूर्ण बरी, खोट्या बातम्या...', विराटच्या भावाकडूनच खुलासा

Vikas Kohli Post: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यानंतर त्याच्या आईची प्रकृती बिघडल्याच्या चर्चा होत्या. पण आता यावर त्याच्या भावानेच स्पष्टीकरण दिले आहे.
Virat Kohli with Brother Vikas and Sister Bhavana
Virat Kohli with Brother Vikas and Sister BhavanaInstagram
Published on
Updated on

Virat Kohli elder brother Vikas dismiss rumors about their mother Saroj's health:

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली आहे. त्याने वैयक्तिक कारण देत माघार घेतली आहे.

दरम्यान, त्याच्या वैयक्तिक कारणाबद्दल तर्कवितर्क न लावण्याची विनंती बीसीसीआयने चाहत्यांना आणि मीडियाला केली होती. मात्र असे असतानाही विराटच्या आईची तब्येत बिघडल्याने त्याने सामन्यांमधून माघार घेतल्याच्या चर्चा होत होत्या. आता याबद्दल स्वत: विराटच्या भावानेच खुलासा केला आहे.

विराटचा भाऊ विकास कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की 'माझ्या निदर्शनास आले आहे की आमच्या आईच्या प्रकृतीबाबत चूकीची बातमी पसरत आहे. मला याबाबत स्पष्ट सांगायचे आहे की आमची आई पूर्ण तंदुरुस्त आहे.'

'त्याचबरोबर मी सर्वांना आणि मीडियालाही विनंती करतो की अशा बातम्या योग्य माहिती नसताना पसरवू नका. सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल आभार.'

खरंतर विराटची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्याने बीसीसीआयकडे सुटीसाठी विनंती केली होती. त्याची ही विनंती बीसीसीआयने मान्य केले.

त्याच्याजागेवर रजत पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 ते 28 जानेवारी दरम्यान हैदराबादला पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच दुसरा सामना आता 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा सामना विशाखापट्टणमला सुरू होणार आहे.

दरम्यान, विराट 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या सामन्यापासून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com