Ministry Of Youth Affairs And Sports: क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई, कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर निलंबित

Ministry Of Youth Affairs And Sports: भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आले आहे.
Vinod Tomar
Vinod TomarTwitter/ @ANI
Published on
Updated on

Ministry Of Youth Affairs And Sports: भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी कुस्ती महासंघाला तात्काळ कळवण्याचे निर्देश भारतीय क्रीडा प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्या निलंबनानंतर या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे.

याआधी, आज भारतीय कुस्ती महासंघाने सर्व आरोपांवर क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांना भारतीय कुस्ती महासंघाने उत्तर दिले आहे. त्याच्या प्रत्युत्तरात, कुस्ती संघटनेने गैरव्यवस्थापनाचे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.

Vinod Tomar
Brij Bhushan Singh: कुस्ती महासंघांच्या अध्यक्षांविरोधात दिग्गज कुस्तीपटू जंतरमंतरवर, लैंगिक शोषणाचा आरोप

या प्रकरणाची सात सदस्यीय समिती चौकशी करत आहे

तत्पूर्वी, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील सुरु असलेल्या गतिरोध दरम्यान कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन केली.

या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम (Mary Kom), डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि 2 वकिलांच्या नावांचा समावेश आहे. चौकशी होईपर्यंत ब्रिजभूषण महासंघाच्या कामापासून दूर राहतील आणि समिती सर्व काम पाहिल, असा निर्णयही घेण्यात आला आहे.

Vinod Tomar
Vinesh Phogat च्या नावे मोठा विक्रम, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकले कांस्यपदक

कुस्ती महासंघाने क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले

दुसरीकडे, कुस्ती महासंघाने क्रीडा मंत्रालयाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, कुस्ती संघटना ही निवडून आलेली संस्था आहे, जी तिच्या घटनेनुसार चालते. त्यामुळे सभापती किंवा अन्य सदस्यांच्या मनमानीचा प्रश्नच उद्भवत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com