Vijay Hazare Trophy: गोव्यासाठी नवा कर्णधार, नवी सुरवात

गोव्यासाठी (Goa) नवा कर्णधार स्नेहल कवठणकर (Snehal Kavthankar) याच्या नेतृत्वाखाली आश्वासक कामगिरी अपेक्षित असेल.
Snehal Kavthankar
Snehal KavthankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विजय हजारे करंडक (Vijay Hazare Trophy) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ई गटातील मोहिमेस बुधवारपासून सुरवात करताना गोव्यासाठी (Goa) नवा कर्णधार स्नेहल कवठणकर (Snehal Kavthankar) याच्या नेतृत्वाखाली आश्वासक कामगिरी अपेक्षित असेल. झारखंडमधील (Jharkhand) रांची येथे आसामविरुद्ध पहिला सामना होईल. गोव्याचा दुसरा सामना राजस्थानविरुद्ध नऊ रोजी होईल. नंतर सेनादलाविरुद्ध 11 रोजी, रेल्वेविरुद्ध 12 रोजी, तर पंजाबविरुद्ध 14 रोजी लढत होईल. आसाम व सेनादलाविरुद्ध गोव्याचा संघ लिस्ट ए (एकदिवसीय) स्पर्धेत प्रथमच खेळत आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-20 (Syed Mushtaq Ali T-20) क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा पाहुणा क्रिकेटपटू यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ नार्वेकर याने गोव्याचे नेतृत्व केले होते, मात्र फलंदाजीत त्याला सूर गवसला नाही. एकनाथला कामगिरी पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे या उद्देशाने गोवा क्रिकेट असोसिएशनने मध्यफळीतील शैलीदार फलंदाज स्नेहल कवठणकर याच्याकडे कर्णधारपद सोपविले आहे. या 26 वर्षीय फलंदाजाने यापूर्वी नियमित कर्णधारच्या अनुपस्थितीत गोव्याचे नेतृत्व केले असले, तरी पूर्णवेळ कर्णधार या नात्याने त्याची ही पहिलीच स्पर्धा आहे. स्नेहलने यापूर्वी वयोगट स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केलेले आहे. बंगळूर येथे 25 वर्षांखालील स्पर्धेत खेळून एकदिवसीय संघात दाखल झालेले गोव्याचे चौघे खेळाडू विलगीकरण प्रक्रियेत आहेत, त्यांचा अपवाद वगळता बाकी खेळाडू उद्या निवडीसाठी उपलब्ध असतील.

Snehal Kavthankar
हार्दिक पांड्या कसोटीमधून घेणार निवृत्ती? 'या' फॉरमॅटला करणार अलविदा!

कामगिरी सुधारण्याची अपेक्षा

गतमोसमातील एकदिवसीय स्पर्धेत गोव्याने पाचपैकी फक्त एकच सामना जिंकला होती. मात्र हैदराबादविरुद्ध विजय थोडक्यात हुकला होता. गोव्याने 346 धावांचा पाठलाग करताना 5 बाद 343 धावा केल्या. त्या लढतीत एकनाथने नाबाद 169, तर स्नेहलने 116 धावा केल्या होत्या. यंदा गोव्याकडून एकदिवसीय स्पर्धेत सुधारित कामगिरी अपेक्षित आहे. गतमहिन्यात लखनौ येथे टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याने पाचपैकी दोन सामने जिंकताना बलाढ्य तमिळनाडूस सात विकेटने हरविण्याचा पराक्रम साधला होता. के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने अष्टपैलू खेळ केल्यास 2017-18 नंतर गोव्याला प्रथमच विजयांची संख्या वाढविता येईल. त्या मोसमात गोव्याने सहापैकी तीन सामने जिंकले होते.

गोव्याचा 20 सदस्यीय संघ

स्नेहल कवठणकर (कर्णधार), अमूल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ, अमित यादव, दीपराज गावकर, एकनाथ केरकर, फेलिक्स आलेमाव, श्रीकांत वाघ, लक्षय गर्ग, मलिकसाब सिरूर, समर दुभाषी, आदित्य कौशिक, विशंबर काहलोन, विजेश प्रभुदेसाई, शुभम रांजणे, सुयश प्रभुदेसाई, मंथन खुटकर, कश्यप बखले, निहाल सुर्लकर, मोहित रेडकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com