Video: जॉनीची सुपर फिल्डींग, रॉकेट थ्रो करून दीपक हुडाला पाठवल माघारी

पंजाबचा पराभव होऊनही जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने बरीच चर्चा केली.
VIDEO Jonny Bairstow Super Fielding
VIDEO Jonny Bairstow Super Fielding Twitter
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने पंजाब किंग्स (PBKS) चा 20 धावांनी पराभव केला. KL राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सचा नऊ सामन्यांमधला हा सहावा विजय होता आणि आता हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहेत. (IPL Updates)

दीपक हुडा झाला धावबाद

पंजाबचा पराभव होऊनही जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने बरीच चर्चा केली. बेअरस्टोने बाऊंड्री लाइनवरून दीपक हुड्डाकडे शानदार थ्रो केला. लखनऊ सुपर जायंट्स इनिंगच्या 14व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जॉनीची ही खेळी बघायला मिळाली. क्रुणाल पंड्याने अर्शदीप सिंगचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला.

VIDEO Jonny Bairstow Super Fielding
दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर जाणार तुरुंगात, जाणून घ्या नेमकं प्रकरण

त्या भागात उपस्थित असलेल्या जॉनी बेअरस्टोने थेट नॉन-स्ट्रायकर एंडला चेंडू टाकला. दीपक हुड्डाला त्या नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचायचे होते, पण तो खूप मागे पडला. विशेष म्हणजे दीपक हुड्डा यालाही कल्पना नव्हती की थ्रो आपल्या बाजूला येईल, त्यामुळे तो वेगाने धावून जॉगिंग करत होता. या रनआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असा रंगला कालचा सामना

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमावून 153 धावा केल्या. यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. याशिवाय दीपक हुडाने 34 आणि दुष्मंता चमीराने 17 धावांचे योगदान दिले.

VIDEO Jonny Bairstow Super Fielding
MI vs RR IPL 2022: फिरकीच्या जादूगाराला राजस्थान रॉयल्स वाहणार श्रध्दांजली

प्रत्युत्तरात पंजाब किंग्जचा संघ निर्धारित षटकांत आठ गडी गमावून केवळ 133 धावा करू शकला. जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. दुसरीकडे मयंक अग्रवालने 25 आणि ऋषी धवनने नाबाद 21 धावांचे योगदान दिले. लखनऊ सुपर जायंट्सकडून मोहसीन खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी कृणाल पांड्या आणि दुष्मंता चमीराने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com