Venkatesh Prasad: 'मंकडींग' वाईट म्हणणाऱ्या ऑसी दिग्गजाला भारताच्या वेंकटेश प्रसादचे चोख प्रत्युत्तर

नॉन-स्ट्रायकरला धावबाद करण्याला चूकीचे म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला वेंकटेश प्रसादने खडेबोल सुनावले आहेत.
Venkatesh Prasad
Venkatesh Prasad Dainik Gomantak
Published on
Updated on

Venkatesh Prasad: क्रिकेटमधील अनेक गोष्टींवर क्रिकेटपटूंमध्ये मतभेद झाल्याने बऱ्याचवेळा पाहायला मिळाले आहे. दरम्यान, मंकडींग म्हणजेच नॉन-स्ट्राईकवरच्या फलंदाजाला गोलंदाजाने धावबाद करण्यावरूनही गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चा होत आहेत. आता यावरच भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉला प्रतिउत्तर दिले आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात रवांडाच्या नॉन-स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाला पाकिस्तानची वेगवान गोलंदाज झाईब-उन-निसाने धावबाद केले. त्यानंतर पुन्हा एकदा मंकडींगची चर्चा सुरू झाली.

Venkatesh Prasad
India vs Sri Lanka ODI: इतिहास घडला! भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी आजवरचा सर्वात मोठा विजय

दरम्यान, या घटनेच्या एका व्हिडिओवर ब्रिटिश ब्रॉडकास्टर पिअर्स मॉर्गन यांनी ट्वीट केले की 'ही गोष्ट कीव येण्यासारखी आहे. मी कधीही अशा लोकांबरोबर क्रिकेट खेळणार नाही, जे याप्रकारे फलंदाजांना बाद करतात.'

यावर प्रतिक्रिया देताना वॉने ट्वीट केले की 'विकेट मिळवण्यासाठी जाणून बुजून संघ योजना आखत आहेत, ही सर्वात वाईट गोष्ट आहे.'

वॉच्या या ट्वीटला वेंकटेश प्रसादने उपहासात्मक प्रतिउत्तर दिले आहे. प्रसादने लिहिले की 'हो, बरोबर आहे. वैध पद्धतीने गोलंदाजांनी फलंदाजाला बाद करण्याची योजना आखणे वाईट. पण फलंदाजाने क्रिजमध्ये न थांबता चूकीच्या पद्धतीने फायदा घेणे चांगली गोष्ट आहे.'

क्रिकेटमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी जर नॉन-स्ट्राईकवरील फलंदाजाने जर क्रीज सोडली, तर गोलंदाज त्याला बाद करतो. अशा प्रकारच्या धावबादला गेल्या अनेकवर्षांपासून मंकडींग म्हणून ओळखले जात होते.

सर्वात आधी भारताच्या विनू मंकड यांनी 1947-48 हंगामात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा अशाप्रकारे फलंदाजांना बाद केले होते. तेव्हापासून अशाप्रकारे बाद करण्याला मंकडींग असे नाव पडले होते.

Venkatesh Prasad
IND vs SL: 'त्याला असं आऊट करायचे नव्हतं...', कर्णधार रोहित शनाकाच्या रनआऊटबद्दल स्पष्टच बोलला

पण, आता आयसीसीने हे स्पष्ट केले आहे की अशा प्रकारे बाद करणे नियमात बसणारे आहे. त्यामुळे हे वैध आहे. तसेच अशाप्रकारच्या बाद होण्यालाही सामान्य धावबादप्रमाणेच समजण्यात येईल.

असे असले तरी अशा प्रकारचे धावबाद खिलाडूवृत्तीला धरून आहे की नाही, यावर सातत्याने चर्चा होत असतात.

काहीदिवसांपूर्वीच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 10 जानेवारीला झालेल्या वनडे सामन्यात मोहम्मद शमीने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनका 98 धावांवर नाबाद असताना अखेरच्या षटकात नॉन-स्ट्राईकवर धावबाद केले होते. त्यावेळी रोहित शर्माने या सामन्यात आधीच भारताचा विजय निश्चित झाला असताना आणि शनकाला शतकासाठी २ धावाच हव्या असताना या विकेटचे अपील मागे घेतले होते. त्यामुळे शनकाला जीवदान मिळाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com