Ind Vs Pak T20: पाकिस्तानविरुद्ध भारताचा 'मोठा प्लॅन'? नवा चेंडू माजवणार खळबळ; गोलंदाजाने दिला इशारा

Ind Vs Pak T20 Worldcup: दोन चेंडू जरी सुरुवातीचे साधे पडले आणि त्याचा फलंदाजाने फायदा उचलला, तर गोलंदाजावरचे दडपण वाढते, असे वरुण म्हणाला.
Ind Vs Pak T20
Ind Vs Pak T20Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: गोलंदाजीतील काही विविधता मी सध्या अभ्यासतो आहे. योग्य लय सापडली, तर कदाचित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मी तो नवा चेंडू टाकू शकतो. नवीन विकसित केलेले अस्त्र कधी वापरायचे हा सगळा निर्णय सामन्यात त्या क्षणी विश्वास कसा वाटतो आहे याचा भाग असेल, असे मत भारताचा हुकमी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने व्यक्त केले.

पाकिस्तानविरुद्ध आपण वरचढ असू, असे सांगून वरुण चक्रवर्ती पुढे म्हणतो, श्रीलंकेतील वातावरणात काही सामने खेळल्याने येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यात किंचित पुढे असतील. तरीही भारतीय संघ एक गट म्हणून त्यांच्या नक्की पुढे आहे. नियोजन, सराव तयारी आणि कौशल्य सगळ्यात थोडातरी पुढे आहे. म्हणूनच निर्णायक क्षणी आम्ही त्यांच्यावर कुरघोडी करणारा खेळ केलेला आहे.

Ind Vs Pak T20
IND vs PAK: विचित्र ॲक्शन अन् भेदक मारा; टीम इंडियासाठी पाकिस्तानचा 'हा' गोलंदाज ठरणार डोकेदुखी, आकाश चोप्राचा फलंदाजांना इशारा VIDEO

जागतिक स्पर्धेत खेळताना तुम्ही तुमचा आत्मविश्वास उंचीवर नेऊन मगच मैदानात पाऊल ठेवायचे असते. कोणत्याही संघाला आपण हरवू शकतो, या विश्वासाने खेळायचे असते. तरच तुम्ही मोठ्या सामन्यातील निर्णायक क्षणी संघाला विजयी करून देणारी कामगिरी करू शकता, असा विश्वास वरुणने व्यक्त केला.

Ind Vs Pak T20
IND vs PAK: पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणानं क्रिकेट फॅन्स 'क्लीन बोल्ड'; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी कोलंबोतील हॉटेल अन् तिकिटांचे दर गगनाला भिडले

विशेषकरून टी-२० क्रिकेटमध्ये २४ चेंडू अगदी नियोजनबद्ध प्रकारेच टाकावे लागतात. मला लय सापडायला थोडा वेळ हवा, असे फिरकी गोलंदाजाला करून अजिबात चालत नाही. दोन चेंडू जरी सुरुवातीचे साधे पडले आणि त्याचा फलंदाजाने फायदा उचलला, तर गोलंदाजावरचे दडपण वाढते, असे वरुण म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com