Senior Womens T-20: उत्तराखंडकडून गोव्याच्या महिला पराभूत

पूर्वजाची झुंजार फलंदाजी
purvaja Verlekar
purvaja VerlekarDainik Gomantak

Senior Womens T-20: सलामीची पूर्वजा वेर्लेकर हिने झुंजार फलंदाजी केली, पण गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाला त्याचा लाभ उठवता आला नाही. उत्तराखंडने एकदिवसीय क्रिकेट सामना पाच विकेट व सहा षटके राखून आरामात जिंकला.

purvaja Verlekar
India vs New Zealand: अन् टॉसवेळी रोहितचा झाला 'गजनी', सोशल मीडियावर मजेदार मीम्स Viral

सामना शनिवारी अमिनगाव-गुवाहाटी येथील क्रिकेट स्टेडियमवर झाला. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 बाद 199 धावा केल्या. पूर्वजाने 114 चेंडूंत 11 चौकार व एका षटकारासह शानदार 81 धावा करताना तनया नाईक हिच्यासमवेत 17.1 षटकांत 60 धावांची सलामी दिली.

मात्र नंतर गोव्याला मोठी धावसंख्या रचता आली नाही. डावातील अखेरच्या टप्प्यात संजुला नाईक (49) व पूर्वा भाईडकर (25) यांनी सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला प्रतिस्पर्ध्यांना दोनशे धावांचे आव्हान देता आले.

purvaja Verlekar
India Vs New Zealand: टीम इंडिया 'अजेय' घरच्या मैदानावर कायम ठेवला शानदार रेकॉर्ड

उत्तराखंडला रीना जिंदाल व राघवी यांनी 47 धावांची सलामी दिली, मात्र नंतर त्यांचा डाव २१व्या षटकात 4 बाद 78असा कोसळला. त्यानंतर पूनम राऊत हिने उत्तराखंडच्या डावाला आकार देत संघाचा विजय साकारला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पूनम हिने नाबाद 57 धावा करताना नंदिनी कश्यप (34) हिच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 62धावांची, तर कर्णधार एकता बिश्त (37) हिच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 63 धावांची अभेद्य भागीदारी केली.

purvaja Verlekar
IND vs NZ: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले 'हे' 5 धाकड

स्पर्धेतील पहिल्या लढतीत गोव्याने हैदराबादला 91धावांनी हरविले होते. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना सोमवारी (ता. 23) हिमाचल प्रदेशविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा : 50 षटकांत 8 बाद 199 (पूर्वजा वेर्लेकर 81, तनया नाईक 11, सुनंदा येत्रेकर 0, तेजस्विनी दुर्गड 8, संजुला नाईक 49, विनवी गुरव 0, श्रेया परब 4, पूर्वा भाईडकर 25, निकिता मळीक नाबाद 10, दीक्षा गावडे नाबाद 1, अंजली कथैत 2-14, पूजा राज 2-31, सारिका कोली 2-14) पराभूत

उत्तराखंड: 44 षटकांत 5 बाद 203 (रीना जिंदाल 17, राघवी 39, पूनम राऊत नाबाद 57, नंदिनी कश्यप 34, एकता बिश्त नाबाद 37, निकिता मळीक 4-0-16-0, मेताली गवंडर 3-0-22-0, सुनंदा येत्रेकर 9-2-27-1, दीक्षा गावडे 10-0-45-2, पूर्वा भाईडकर 10-1-31-1, तनया नाईक 4-0-36-0, संजुला नाईक 1-0-6-0, तेजस्विनी दुर्गड 1-0-4-0, श्रेया परब 2-1-8-0)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com