state level chess tournament
state level chess tournament Dainik Gomantak

Chess Tournament : राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जीव्हीएम उच्च माध्यमिकची विजयी हॅटट्रिक

मुलींत दामोदर उच्च माध्यमिक अजिंक्य
Published on

state level chess tournament : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या 19 वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत जीव्हीएम एसएनजेए उच्च माध्यमिक विद्यालयाने शानदार हॅटट्रिक साधताना सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय विजेतेपदाचा पराक्रम साधला.

मुलींत मडगावच्या श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाने जेतेपद संपादले. स्पर्धा शुक्रवारी मिरामार येथील यूथ हॉस्टेलमध्ये झाली.

state level chess tournament
अखेर मोपा विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय सेवा सुरू; एअर इंडियाचे लंडनसाठी 'टेकऑफ'

जीव्हीएम एसएनजेए उच्च माध्यमिक विद्यालयाने अंतिम लढतीत कुजिरा येथील मुष्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालयास 3-1 फरकाने हरविले. विजयी संघात यश उपाध्ये, सुयश पै, मधुराज राणे, महंमद मोमिन, तन्वेश गावडे या खेळाडूंचा समावेश होता.

संघाला शारीरिक शिक्षण शिक्षक प्रवीण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. म्हापशाच्या सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालयाने काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिकला ४-० असे हरवून तिसरा क्रमांक प्राप्त केला.

श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलींत बाजी मारताना अंतिम लढतीत डिचोलीच्या श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयास ३-१ असे नमविले.

state level chess tournament
पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी मंत्री बाबूशना तात्पुरता दिलासा, जेनीफर यांचा अर्ज फेटाळला

विजयी संघाचे लुसिया डायस, ऐश्वर्या नायक, सान्वी नाईक गावकर, आश्वी देसाई, वृत्तिका नाईक गावकर यांनी प्रतिनिधित्व केले. संघाला शारीरिक शिक्षण शिक्षक जतिंदर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. सांगे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ न आल्यामुळे पणजीच्या डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला.

बक्षीस वितरण समारंभ क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या साहाय्यक संचालक नीलम मयेकर, विभागीय क्रीडा आयोजक संजय शिरोडकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर दत्ताराम पिंगे व राज्यस्तरीय क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या उपस्थितीत झाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com