Cricket Records: 6, 6, 6, 6, 6... गोलंदाज नाही, तर तो ठरला खरा फिनिशर! कसोटीत 9व्या क्रमांकावर 310च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा; उमेश यादवचा रेकॉर्ड अबाधित

Umesh Yadav Test Record 2019: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने एकदा बॅटिंगला उतरल्यावर कसोटी क्रिकेटची हीच व्याख्या बदलून टाकली होती.
Umesh Yadav Test Record 2019
Umesh YadavDainikGomantak
Published on
Updated on

Umesh Yadav Test Record 2019: कसोटी क्रिकेट हा मुळात संयम आणि टेक्निकचा खेळ मानला जातो. जिथे फलंदाज तासनतास खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी धडपडत असतात, तिथे धावांचा पाऊस पाडणे कठीण असते. मात्र, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने एकदा बॅटिंगला उतरल्यावर कसोटी क्रिकेटची हीच व्याख्या बदलून टाकली होती.

9व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अशी काही धुलाई केली की, कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान खेळीचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला गेला. हा असा रेकॉर्ड आहे जो आजही अबाधित असून मागील नऊ वर्षांत (2019 पासून) कोणत्याही फलंदाजाला तो मोडता आलेला नाही.

ही ऐतिहासिक घटना 2019 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात घडली होती. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवत दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात दिमाखदार द्विशतक झळकावले होते, तर अजिंक्य रहाणेने 115 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. अष्टपैलू रवींद्र जडेजानेही 52 धावांचे योगदान दिले होते. मात्र, खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले ते 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उमेश यादवने. उमेशने मैदानात पाऊल ठेवल्यापासूनच आक्रमक पवित्र घेतला आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला.

Umesh Yadav Test Record 2019
Rohit Sharma: 'मुंबईच्या राजा'चं दमदार कमबॅक! LSG विरूध्द रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

उमेशने अवघ्या 10 चेंडूंत 31 धावांची वादळी खेळी खेळली. विशेष म्हणजे, या छोट्याशा डावात त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 5 उत्तुंग षटकार ठोकले. या खेळी दरम्यान उमेशचा स्ट्राईक रेट 310 इतका होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 10 चेंडू खेळलेल्या फलंदाजांमध्ये हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्ट्राईक रेट ठरला. उमेशच्या या अनपेक्षित तडाख्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. 9व्या क्रमांकावर येऊन अशी 'कॅमिओ' खेळी खेळणे कोणत्याही संघासाठी सामन्याचे पारडे फिरवणारे ठरते आणि उमेशने तेच करुन दाखवले.

भारताने आपला पहिला डाव 497 धावांवर घोषित केला होता. उमेश यादव आणि रोहित शर्माच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने (Team India) सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. धावांच्या या डोंगराखाली दबलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 162 आणि दुसऱ्या डावात 133 धावांवरच गारद झाला. भारताने हा सामना 202 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com