'धारबांदोड्यात टर्फ क्रिकेट खेळपट्टी तयार'

panchayat.jpg
panchayat.jpg
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशन (Goa Cricket Association) (जीसीए) आणि धारबांदोडा पंचायत (Dharbandoda Panchayat) यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत धारबांदोड्यातील मैदानावर तीन दर्जेदार टर्फ खेळपट्ट्या प्रत्यक्षात आल्या आहेत, लवकरच बाह्य मैदानावरही हिरवळ आल्यानंतर मैदान क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज होईल. याठिकाणी शालेय, तसेच क्लब पातळीवरील सामने खेळविण्याचे नियोजन आहे. 

धारबांदोडा मैदान विकासासाठी पंचायत व जीसीए यांच्यात गतवर्षी नोव्हेंबरमध्ये नऊ वर्षांचा करार झाला होता. त्यानुसार याठिकाणी टर्फ खेळपट्ट्या साकारल्या आहेत. याशिवाय सरावासाठी सिमेंट खेळपट्ट्याही असतील. मैदानाची निगराणी, व्यवस्था जीसीए पाहील, शिवाय कुशल प्रशिक्षकाचीही सोय केली जाणार आहे.

जीसीएने कोरोना विषाणू महामारी (Covid19) कालावधीत राज्यस्तरीय मैदानावरील क्रिकेट ठप्प असताना राज्यातील क्रिकेट सुविधा विकासावर भर दिला आहे. त्यानुसार, क्रिकेट मैदाने विकसित होत आहे. गतवर्षी जीसीएने पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) मैदानावरील पाच टर्फ, तसेच सराव खेळपट्ट्यांचे काम पूर्ण केले होते. या ठिकाणच्या बाह्य मैदानाचे थोडे काम बाकी असून पाऊस कमी झाल्यानंतर ते पूर्ण केले जाईल, असे माहिती जीसीएकडून देण्यात आली. जीसीएने पणजी जिमखान्याशीही करार केला आहे.

काणकोण (Canacona) तालुक्यातील माशे येथील निराकार मैदानावरील टर्फ खेळपट्ट्यांचे कामही जीसीएने हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात आहे. तेथेही सराव खेळपट्टीची व्यवस्था असेल. काणकोण येथील मल्लिकार्जुन विद्यालय संकुलात क्रिकेट इनडोअर सुविधा तयार करण्यास जीसीएने प्राधान्य दिले असून तेथे सराव खेळपट्ट्यांची सोय असेल, असे जीसीएने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IND vs NZ 2nd Test Mohammed Siraj dropped from playing XI
Sandpaper Gate controversy
Mumbai Indians New Captain 2027
Krunal Pandya Shoe Incident