Tokyo Olympic: व्ही.रेवती महिलांच्या निवड चाचणीमध्ये पात्र

ऑलिंपिकसाठी (Olympics) 400 मीटर निवड चाचणीत महिलांमध्ये व्ही. रेवतीने (V. Revati) बाजी मारत मिश्र संघात स्थान पक्के केले आहे.
V. Revati
V. RevatiDainik Gomantak
Published on
Updated on

ऑलिंपिकसाठी (Olympics) 400 मीटर निवड चाचणीत महिलांमध्ये व्ही. रेवतीने (V. Revati) बाजी मारत मिश्र संघात स्थान पक्के केले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत धनलक्ष्मीला (Dhanalakshmi) शंभर मीटरमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

भारताचा (India) मिश्र संघ ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे. यासाठी पूवम्मा राष्ट्रीय स्पर्धेत दुसरी आल्याने तिची निवड पक्की मानली जात होती. परंतु दुखापतीमुळे तीने शिबीर सोडले. त्यामुळे निवडचाचणीच्यावेळी ती उपस्थित नव्हती.

V. Revati
प्रशिक्षकपदासाठी द्रविडने नकार दिल्यास 'या' तीन दिग्गजांची नावे चर्चेत

तिच्या गैरहजेरीत व्ही. रेवतीने 53.55 सेंकद वेळ देत बाजी मारली आहे. तर व्ही. शुभा दुसरी आली आणि जयलक्ष्मीला (Jayalakshmi) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जिश्र्ना मॅथ्यूला (Jishrna Mathew) चौथ्या व विसम्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर पुरुषांच्या रिले शर्यतीकरिता तीन राखीव खेळाडूंची निवड होणार होती. सार्थक भांबरीने शर्यतीत बाजी मारली. या चाचणीनंतर आता निवड समिती अंतिम संघाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ऑलिम्पिकसाठी अंतिम संघ पाठविण्याची मुदत आज संध्याकाळपर्यंतच असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com