तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं सोडली कॅप्टनसी!

टिम पेनने (Tim Paine) 2017 मध्ये एका मुलीला त्याचा अश्लील फोटो पाठवला होता आणि त्यासोबत त्याने तिला गलिच्छ मेसेजही पाठवले होते.
Tim Paine
Tim PaineDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलियाचा (Australia) कसोटी कर्णधार टीम पेनने (Tim Paine) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टीम पेनवर तरुणीला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. टिम पेनने 2017 मध्ये एका मुलीला त्याचा अश्लील फोटो पाठवला होता आणि त्यासोबत त्याने तिला गलिच्छ मेसेजही पाठवले होते. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर आता टीम पेनला अॅशेस मालिकेपूर्वी (Ashes Series) कर्णधारपद सोडावे लागणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाची घोषणा करण्यात आली होती, ज्याची कमान टीम पेनच्या हातात होती, परंतु आता त्याला संघात स्थान मिळणेही कठीण झाले आहे. टीम पेनच्या जागी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला (Pat Cummins) ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. जरी या शर्यतीत मार्नस लॅबुशेन देखील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, 2018 मध्ये, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर, टीम पेनची स्वच्छ प्रतिमा पाहून त्याला ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद देण्यात आले होते, परंतु आता तो स्वतः एका मोठ्या प्रकरणात अडकला आहे. टीम पेनने शुक्रवारी एक निवेदन जारी करुन सांगितले की, मी आपल्या कृत्याबद्दल माफी मागतो आणि आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांनीही टीम पेनच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष म्हणाले, 'टिमने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Tim Paine
एबी डिव्हिलियर्सचा IPL ला ही अलविदा

टीम पेनला संघात राहायचे आहे

टीम पेनने 2017 मध्ये एका महिलेला अश्लील मेसेज केल्याची कबुली मीडियासमोर दिली. ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधारपद सोडत असल्याचे सांगताना टीम पेन रडला. मात्र, टीम पेनने संघात कायम राहायचे असल्याचे सांगितले. टीम पेनने सांगितले की, '4 वर्षांपूर्वी मी एका सहकारी महिलेला अश्लील मेसेज पाठवला होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेट त्या प्रकरणाची चौकशी करत होते आणि मी संपूर्ण तपास प्रक्रियेत भाग घेतला. तपासादरम्यान, क्रिकेट तस्मानियाला आढळले की, मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही. मात्र, ती घटना घडल्यावर मी माफी मागितली. मी माझी पत्नी आणि कुटुंबीयांची माफीही मागितली आहे.

टीम पेनने चाहत्यांची माफी मागितली

क्रिकेटची प्रतिमा खराब केल्याबद्दल टीम पेनने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सर्व चाहत्यांची आणि खेळाडूंची माफी मागितली आहे. टीम पेन म्हणाला, 'मी क्रिकेटची प्रतिमा खराब केली आहे, त्यामुळे कर्णधारपदावर कायम राहणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी तात्काळ राजीनामा देत आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता. मी सर्व चाहत्यांची आणि माझ्या सहकारी खेळाडूंची माफी मागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com