Saudi Arabia Beats Argentina: सौदी अरेबियाविरुद्ध अर्जेंटिनाच्या धक्कादायक पराभवाची 3 कारणे

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये तिसऱ्या दिवशी ग्रुप सी मधील अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यात रोमांचकारी सामना झाला.
Saudi Arabia Beats Argentina
Saudi Arabia Beats ArgentinaDainik Gomantak

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये तिसऱ्या दिवशी ग्रुप सी मधील अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यात रोमांचकारी सामना झाला. या सामन्यात सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 अशा फरकाने पराभूत करुन मोठा धक्का दिला. या पराभवाबरोबरच अर्जेंटिनाचा सलग 36 सामने अपराजीत राहण्याचा रथही सौदी अरेबियाने रोखला.

दरम्यान, या सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) फर्स्ट हाफपर्यंत 1-0 अशी आघाडी घेतली होती. हा गोलही अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) 10 व्याच मिनिटाला नोंदवला होता. मात्र नंतर सेकंड हाफमध्ये ही आघाडी कायम ठेवण्यात अर्जेंटिनाला अपयश आले आणि केवळ 5 मिनिटाच्या अंतरात त्यांनी दोन गोल स्विकारल्याने ते सामन्यात मागे पडले.

Saudi Arabia Beats Argentina
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये खेळाडुंना एका सामन्यासाठी किती मोबदला मिळतो?

यापूर्वी, अर्जेंटिना 2019 मध्ये ब्राझीलविरुद्ध (Brazil) कोपा अमेरिका स्पर्धेत पराभूत झाले होते. त्यानंतर आता तब्बल 36 सामन्यांनंतर त्यांना पहिला पराभव स्विकाराला लागला आहे, तोही वर्ल्डकपमध्ये. त्याचमुळे तो अधिक धक्कादायक ठरला आहे.

पराभवाची 3 कारणे

ऑफसाईड्सचा सापळा -

लियोनेल मेस्सी, लोटारो मार्टिनेझ , एंजेल डि मारिया यांसारखे दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेला अर्जेंटिना संघ सौदी अरेबिया विरुद्ध ऑफसाईडच्या जाळ्यात अडकल्याचे दिसले. अर्जेंटिनाच्या नावावर तब्बल 10 ऑफसाईड्स नोंदवले गेले, तर सौदी अरेबियाच्या नावावर केवळ एक ऑफसाईडची नोंद झाली. विशेष म्हणजे मेस्सी, लोटारो मार्टिनेझ यांनी नोंदवलेले प्रत्येकी एक गोल देखील ऑफसाईड ठरले होते, जे अर्जेंटिनासाठी महागात पडले.

Saudi Arabia Beats Argentina
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये खेळाडुंना एका सामन्यासाठी किती मोबदला मिळतो?

पासिंगमधील अभाव -

खरंतर अर्जेंटिनाचा सामन्यात फुटबॉलवर ताबा चांगला होता. त्यांनी 70 टक्के बॉलवर ताबा ठेवला होता. मात्र, त्यांच्यात पासिंगचा अभाव दिसून आला. तसेच पासेसचे रूपांतर गोलमध्ये करण्यात अपयश आले त्यांना अपयश आले. त्यामुळे हे एक अर्जेंटिनाच्या पराभवाचे कारण असू शकते.

Saudi Arabia Beats Argentina
FIFA World Cup 2022: मेस्सी, रोनाल्डो ठरतील का स्पेशल प्लेयर? 'हे' संघ फिफा वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार

सौदी अरेबियाने संधीचे केले सोने

फर्स्ट हाफमध्ये पिछाडी स्विकारल्यानंतर सौदीने सेकंड हाफमध्ये दडपण न घेता आक्रमक पवित्रा स्विकारला. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मिळालेल्या संधी साधल्या. सौदीच्या सालेह अलशेहरीनी 48 व्या मिनिटाला आणि सालेम अलदौसरी याने 53 व्या मिनिटाला, असे 5 मिनिटाच्या अंतरात मिळालेली संधी साधून गोल नोंदवले. दुसरीकडे बॉलवर अधिक ताबा असूनही संधीचे सोने न करता आल्याने अर्जेंटिना सामन्यात मागे पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com