Abu Dhabi T10 League 2022: अबु धाबी टी10 लीगमध्ये खेळणार 'हे' 5 माजी भारतीय क्रिकेटपटू

12 दिवसात एकुण 33 सामने; 4 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना
Abu Dhabi T10 League 2022
Abu Dhabi T10 League 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Abu Dhabi T10 League 2022: अबू धाबी टी10 लीगला आज 23 नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. झटपट क्रिकेट स्पर्धेच्या आणखी एका सीझनसाठी अबु धाबी तयार असून या लीग स्पर्धेत 5 माजी भारतीय किकेटपटू खेळणार आहेत. त्यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

Abu Dhabi T10 League 2022
Morocco vs Croatia Match Tied: गतउपविजेत्या क्रोएशियाची गोलची पाटी कोरी; मोरक्कोविरूद्धचा सामना अनिर्णित

अबू धाबी टी 10 लीग मध्ये 8 संघ असणार आहेत. बांग्ला टायगर्स, चेन्नई ब्रेव्स, दिल्ली बुल्स, डेक्कन ग्लॅडिएटर्स, न्यूयॉर्क स्ट्रायकर्स, नॉर्दर्न वॉरियर्स, सॅम्प आर्मी, टीम अबू धाबी हे ते संघ आहेत. 10-10 ओवरचे हे सामने असतील. टॉप 4 संघ प्ले ऑफमध्ये पोहचतील. 4 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. पुढील 12 दिवसात एकुण 33 सामने होतील.

सुरेश रैना

सुरेश रैना अबू धाबी टी10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स संघासाठी खेळतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार जे भारतीय क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत खेळत आहेत, त्यांना इतर फ्रँचायजीकडून खेळण्याची परवानगी नाही. परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी रैनाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रैना शेवटचा आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्स खेळला होता. त्यानंतर तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 चाही भाग होता.

हरभजन सिंग

ऑफ स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग 2021 च्या आयपीएल नंतर निवृत्ती स्विकारील होती. तो तेव्हा कोलकाता नाइट राइडर्सकडून खेळला होता. या टी-10 लीगमध्ये तो दिल्ली बुल्स या संघाकडून खेळणार आहे.

एस श्रीसंत

माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत हा मैदानावरील कारकिर्दीपेक्षा मैदानावबाहेर वादांमुळेच जास्त गाजला. 7 वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत 2020 मध्ये केरळसाठी क्रिकेट खेळला. पण गत दोन वर्षात त्याला आयपीएलमध्ये कुणाकडूनही निवडले गेले नाही. त्याने मार्चमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो या लीगमध्ये बांग्ला टायगर्सकडून खेळणार आहे.

Abu Dhabi T10 League 2022
First Women Referee In FIFA World Cup: फ्रान्सच्या स्टेफनीने रचला इतिहास; फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बनली पहिली महिला रेफ्री

स्टुअर्ट बिन्नी

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने ऑगस्ट 2021 मध्ये निवृत्ती घेतली. तेव्हापासून तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज आणि अन्य तीन लीगमध्ये खेळतो आहे. बिन्नी न्यूयॉर्क स्टायकर्सकडून खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व किएरॉन पोलार्ड करत आहे.

अभिमन्यु मिथुन

कर्नाटक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी खेळलेला माजी वेगवान गोलंदाज अभिमन्यु मिथुन सध्या 33 वर्षांचा आहे. त्याने 4 कसोटी आणि 5 वनडे मॅचमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये इंडियन लीजेंड्स संघाचा सदस्य आहे. तर अबू धाबी टी10 लीगमध्ये तो नॉर्दर्न वॉरियर्सकडून खेळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com