रणजी क्रिकेटमध्ये गोव्यावरील दबाव वाढला

आक्रमक फलंदाजीसह सौराष्ट्रची त्रिशतकी आघाडी
Goa Ranji Cricket Team
Goa Ranji Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ranji Cricket Team: गोव्याने शनिवारी सकाळी चार विकेट झटपट गमावल्यामुळे त्यांना पिछाडीवर राहावे लागले. नंतर गतविजेत्या सौराष्ट्रने झटपट क्रिकेटला साजेशी आक्रमक फलंदाजी करत एकूण आघाडी त्रिशतकी केली, यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ड गट सामना जिंकण्याची त्यांना संधी प्राप्त झाली असून गोव्यावरील दबाव वाढला.

Goa Ranji Cricket Team
...त्यामुळे मच्छिमारांच्या उपजिविकेवर होणार परिणाम?

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याचा चौथा दिवस रविवारी गोव्याच्या फलंदाजांचा कस पाहणारा ठरेल. सौराष्ट्रपाशी पहिल्या डावातील 36 मिळून एकूण 341 धावांची आघाडी आहे. कालच्या 4 बाद 239 धावांवरून गोव्याचा पहिला डाव 311 धावांत आटोपला. नंतर तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी गतविजेत्यांनी 57 षटकांत 3 बाद 305 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (64) व शेल्डन जॅक्सन (53) यांनी चौथ्या विकेटसाठी 95 धावांची अभेद्य भागीदारी केली. हार्विक देसाई (77) व स्नेल पटेल (61) यांनी 138 धावांची धडाकेबाज सलामी दिली.

गोव्याची शनिवारी सकाळी पडझड झाली. दुसऱ्या दिवसअखेर नाबाद असलेले अर्धशतकवीर शुभम रांजणे (62) व एकनाथ केरकर (62), तसेच मोसमात फलंदाजीत अपयशी ठरलेला दर्शन मिसाळ (0) फक्त चार धावांच्या अंतराने माघारी परतले, नंतर श्रीकांत वाघही (9) लवकर बाद झाल्यामुळे सौराष्ट्रला मोठ्या आघाडीची संधी प्राप्त झाली. मात्र लक्षय गर्ग (28) व अमित यादव (16) यांनी नवव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याने त्रिशतकी धावसंख्या पार केली, तसेच पिछाडीचे अंतरही कमी झाले. सौराष्ट्रचा यष्टिरक्षक स्नेल पटेल याने पाच झेल पकडून गोलंदाजांना सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव : 347 व दुसरा डाव: 57 षटकांत 3 बाद 305 (हार्विक देसाई 77, स्नेल पटेल 61, चेतेश्वर पुजारा नाबाद 64, चिराग जानी 38, शेल्डन जॅक्सन नाबाद 53, श्रीकांत वाघ 5-1-17-0, शुभम रांजणे 10-4-34-0, सुयश प्रभुदेसाई 7-0-58-1, लक्षय गर्ग 5-0-21-1, अमित यादव 13-0-80-0, दर्शन मिसाळ 11-1-62-0, मलिक सिरूर 6-0-26-1).

गोवा, पहिला डाव (4 बाद 239 वरून) : 109.5 षटकांत सर्वबाद 311 (शुभम रांजणे 62, एकनाथ केरकर 62, दर्शन मिसाळ 0, श्रीकांत वाघ 9, लक्षय गर्ग 28, अमित यादव 16, मलिक सिरूर नाबाद 2, जयदेव उनाडकट 2-48, चेतन सकारिया 3-55, चिराग जानी 1-14, धर्मेंद्रसिंह जडेजा 1-80, पार्थ भूत 3-76).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com