Viral Video: अवघ्या तीन चेंडूंनंतरच सामना थांबवण्याची नामुष्की, पाहा राजस्थान-लखनऊ सामन्यातील व्हायरल व्हिडिओ

Spider Cam In IPL: रण सामना सुरू होताच अनेक समस्या निर्माण झाल्या आणि बराच वेळ सामना थांबवावा लागला. कधी स्पायडर कॅममध्ये तर कधी स्टंप बेलमध्ये अडचण निर्माण झाली
Spider Cam, IPL 2024.
Spider Cam, IPL 2024.Dainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. मात्र, या सामन्यादरम्यान आलेल्या अडचणींमुळे हा सामना आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

कारण सामना सुरू होताच अनेक समस्या निर्माण झाल्या आणि बराच वेळ सामना थांबवावा लागला. कधी स्पायडर कॅममध्ये तर कधी स्टंप बेलमध्ये अडचण निर्माण झाली, त्यामुळे पहिल्या षटकातच सामना थांबवावा लागला होता.

या सामन्यात राजस्थानने नानेफेक जिकंत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली.

डावाच्या पहिल्या षटकातील दोन चेंडूंनंतर स्पायडर कॅममुळे सामना थांबवण्यात आला. डावाच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्पायडर कॅमची केबल जमिनीवर पसरली होती, जी कॅमेरामनला गोळा करायला थोडा वेळ लागला. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना सुमारे 6-7 मिनिटे थांबवण्यात आला.

यानंतर मैदानाच्या व्यवस्थापनाने यामध्ये हस्तक्षेप केल्याने सामना पुन्हा सुरू झाला. आता या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com