महिला कसोटी क्रिकेटचे दिवस बदलणार, BCCI ने टीम इंडियाला दिली मोठी भेट

आता लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) पाच दिवसीय कसोटी सामने खेळताना दिसणार आहे.
Indian Women Cricket Team
Indian Women Cricket Team Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटमधील कसोटी फॉरमॅटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) पाच दिवसीय कसोटी सामने खेळताना दिसणार आहे. शनिवार 4 डिसेंबर रोजी कोलकाता (Kolkata) येथे बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (BCCI AGM) हा मोठा निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रिकेट बोर्डाने या एजीएममध्ये अनेक मोठे निर्णय घेतले असून कदाचित हा त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. भारतीय महिला संघ यावर्षी कसोटी फॉर्मेटमध्ये परतला, त्यानंतर भारतीय संघाने 4 महिन्यांत दोन कसोटी सामने खेळले. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर महिला संघाची कसोटी क्रिकेटची संख्या वाढवण्याची मागणी होत होती. यासोबतच महिला टेस्ट पाच दिवसांची करण्याची मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, आतापर्यंत फक्त पुरुषांच्या क्रिकेटमध्ये कसोटी सामने चार दिवस खेळले जातात, तर महिलांचे कसोटी सामने साधारणपणे चार दिवसांचे असतात. मात्र अलीकडच्या काळात चार दिवस रोमांचक स्पर्धा होऊनही निकाल न लागल्याने त्यात बदल करण्याची मागणी होत होती. या वर्षी जूनमध्ये ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ सात वर्षांनंतर या फॉर्मेटमध्ये परतला, असे असतानाही भारताने चारही दिवस या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत आपला पराभव टाळून इंग्लंडविरुद्ध विजय नोंदवण्याच्या दिशेने वाटचाल केली. परंतु चार दिवसीय सामन्यामुळे सामना अनिर्णित राहिला.

Indian Women Cricket Team
IND VS NZ: न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये येताच कोहलीने जिंकले क्रिकेटप्रेमींचे मन!

ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी खेळली

केवळ ब्रिस्टलच नाही तर ऑक्टोबरमध्येच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर टीम इंडियाने कसोटी सामनाही खेळला होता. BCCI आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही दिवस-रात्र कसोटी म्हणून आयोजित केली, जी भारतीय संघासाठी प्रथमच होती. या सामन्यातही भारतीय महिला संघाने आपल्या अधिक अनुभवी ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या दिशेने ढकलले होते, मात्र अवघ्या 4 दिवसांत सामना संपल्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडिया ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिली.

टीम इंडियाचे वर्ल्डकप वर लक्ष

टीम इंडियाची दमदार कामगिरी पाहता बीसीसीआयला हा निर्णय घेणे भाग पडले आहे. भारतीय संघ सध्या एकही कसोटी सामना खेळताना दिसत नाही. टीम इंडियाचे पूर्ण लक्ष पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या विश्वचषकासाठी टीम इंडिया जानेवारी-फेब्रुवारीमध्ये किवी देशाचा दौरा करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com