अमेरिकेच्या एका खेळाडूने मैदानावरील हजारो चहात्यांच्या उपस्थितीत आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.
अमेरिकेच्या एका खेळाडूने मैदानावरील हजारो चहात्यांच्या उपस्थितीत आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.Dainik Gomantak

फुटबॉलपटूने मैदानातच हजारो चहात्यांसमोर प्रेयसीला केले प्रपोज

मेजर सॉकर या फुटबॉल लीग स्पर्धेत (MSL) अमेरिकेच्या एका खेळाडूने मैदानावरील हजारो चहात्यांच्या उपस्थितीत आपल्या प्रेयसीला प्रपोज (Proposal) केले.
Published on

अमेरिकेच्या (America) एका फुटबॉलपटूने (Football) मैदानावरील हजारो प्रेक्षकांच्या (Thousands of spectators on the field) समोर असे काही केले ज्यामुळे हा खेळाडू त्याच्या खेळाशिवाय त्या गोष्टीमुळे जास्त चर्चेत आहे. त्याने केलेल्या या कृत्याचा व्हिडिओ देखील सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मेजर सॉकर या फुटबॉल लीग स्पर्धेत (MSL) अमेरिकेच्या एका खेळाडूने मैदानावरील हजारो चहात्यांच्या उपस्थितीत आपल्या प्रेयसीला (girlfriend) प्रपोज (Proposal) केले. एमएसएल लीग स्पर्धेत मिनीसोटा एफसी विरुध्द सॅन होजे अर्थक्वेक असा सामना रंगला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. पण हा सामना एक वेगळ्याच कारणामुळे गजला आहे.

अमेरिकेच्या एका खेळाडूने मैदानावरील हजारो चहात्यांच्या उपस्थितीत आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.
EURO 2020 quarterfinals: स्पेन, इटली, इंग्लंड, बेल्जियम यांना उपांत्य फेरीचे वेध

सामना संपल्यानंतर भर मैदानात सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत मिनीसोटाचा फुटबॉलपटू हसानी डॉटसन स्टिफनसन (Hasani Dotson Stephenson) याने आपली प्रेयसी पेट्रा वुकोविचला (Petra Vukovich) प्रपोज केले. हसानीने गुडघ्यावर बसून त्याच्या प्रेयसिच्या हातात रिंग घातली. त्याच्या या कृत्याने त्याची प्रेयसी सकट सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काही वेळ हसानीची प्रेयसी पेट्रा वुकोविचला देखील विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तीने हाताने आपले डोळे बंद करुन घेतले. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ही सर्व गोष्ट मैदानातील प्रेक्षक पाहत होते. या दोघांनी एकमेकांना मिठी मारताच उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना चिअर करत टाळ्यावाजवून त्यांचे अभिनंदन केले. त्याचा व्हिडिओ देखील या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com