I-League : चर्चिल ब्रदर्सचा अखेर विजय

I-League : केनेथच्या दोन गोलमुळे मोहम्मेडनची विजयी घोडदौड खंडित
Churchill Brothers
Churchill BrothersKishor Petkar
Published on
Updated on

पणजी : नायजेरियन केनेथ न्ग्वोके इकेचुक्वू याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अखेर पहिला विजय नोंदविला. त्यांनी कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंगची विजयी घोडदौड खंडित करताना सामना २-१ फरकाने जिंकला. (The Churchill Brothers first victory in the I-League football tournament)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) कल्याणी येथे झालेल्या या लढतीत चर्चिल ब्रदर्स संघ पूर्वार्धात एका गोलने आघाडीवर होता. केनेथ याने पहिला गोल दुसऱ्याच मिनिटास केला. नंतर ५७व्या मिनिटास त्रिनिदादच्या मार्कुस जोसेफ याने स्पर्धेत आठवा गोल (Goal) नोंदविताना ५७व्या मिनिटास मोहम्मेडन स्पोर्टिंगला बरोबरी साधून दिली. नंतर ६२व्या मिनिटास केनेथने पुन्हा गोल केल्यामुळे माजी विजेत्यांना आघाडी मिळाली व त्यांनी ती शेवटपर्यंत टिकवली.

ओळीने चार सामने जिंकलेल्या मोहम्मेडन स्पोर्टिंगचा (Mohammedan Sporting) हा पहिलाच पराभव ठरला. त्यांचे १२ गुण व पहिला क्रमांक कायम राहिला. तीन पराभव व एका बरोबरीनंतर चर्चिल ब्रदर्सने (Churchill Brothers) विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले, त्यामुळे त्यांचे आता पाच लढतीनंतर चार गुण झाले असून अकरावा क्रमांक मिळाला आहे.

Churchill Brothers
IPL 2022 पूर्वीचं दिल्ली कॅपिटल्स च्या बसवर हल्ला!

मोहम्मेडन स्पोर्टिंगचा गोलरक्षक व बचावपटूत उडालेल्या गोंधळाचा लाभ उठवत केनेथने सामना सुरू झाल्यानंतर लगेच गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर अकराव्या मिनिटास कोमरॉन तुर्सूनोव याचा वेगवान फटका मोहम्मेडनचा गोलरक्षक (Goalkeeper) झोथान्माविया याने रोखल्यामुळे चर्चिल ब्रदर्सची आघाडी वाढू शकली नाही.

विश्रांतीनंतर बाराव्या मिनिटास निकोला स्टोयानोविच याच्या कॉर्नर फटक्यावर जोसेफचा हेडर भेदक ठरल्यामुळे मोहम्मेडनला बरोबरी साधता आली. तासाभराच्या खेळानंतर केनेथने मोहम्मेडनच्या बचावपटूंस गुंगारा जोरदार मुसंडी मारली आणि समोर केवळ गोलरक्षक असताना अचूक फटका मारत संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटास मोहम्मेडनला बरोबरी साधता आली असती, पण मार्कुस जोसेफचा ताकदवान फटका गोलपोस्टला आपटल्यामुळे गोल (Goal) होऊ शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com