गोव्याच्या महिलांचे आव्हान संपुष्टात ; पावसाच्या आगमनानंतर पंजाबचा 17 धावांनी विजय!

त्यामुळे निकालासाठी व्हीजेडी पद्धतीचा अवलंब झाला, त्यात पंजाबला 17 धावांनी विजय मिळाला.
Cricket
Cricket Dainik Gomantak

बंगळूरमधील (Bangalore) ढगाळ हवामानात सकाळी फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याला सुरवातीस झटके बसले, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणे अवघड ठरले. नंतर पंजाबची वाटचाल लक्ष्याच्या दिशेने असताना पाऊस आला. त्यामुळे निकालासाठी व्हीजेडी पद्धतीचा अवलंब झाला, त्यात पंजाबला 17 धावांनी विजय मिळाला आणि गोव्याचे सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

सामना शनिवारी बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 29 वरून 48.3 षटकांत 179 धावा केल्या. पंजाबची स्थिती 41.2 षटकांत 3 बाद 142 असताना पाऊस आला. यावेळी त्यांना विजयासाठी 38 धावांची गरज होती. पुढे खेळ सुरू होण्याची शक्यता नसल्याने व्हीजेडी पद्धतीचा अवलंब झाला. त्यात गोव्याचा संघ 17 धावांनी पिछाडीवर राहिला. पंजाबने सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविली.

Cricket
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचे संघ!

पंजाबची जम बसलेली खेळाडू परवीन खान (44) 3 बाद 124 धावसंख्येवर पायाचा स्नायू दुखावल्यामुळे माघारी परतली. मात्र फॉर्ममध्ये असलेली डावखुरी कनिका गुप्ता (नाबाद 34) हिने समर्थपणे फलंदाजी करत गोव्याच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यापूर्वी सलामीची रिधिमा अगरवाल (38) हिने परवीन हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली होती.

गोव्याच्या डावास धक्के

गोव्याने सकाळच्या सत्रात सुरवातीस 8 धावांत 4 विकेट गमावल्या. त्यांची बिनबाद 21 वरून 4 बाद 29 घसरगुंडी उडाली. नंतर कर्णधार शिखा पांडेने जबाबदारीने खेळत संजुला नाईक व विनवी गुरव यांच्या साथीत डाव सावरला. शिखाने 75 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 49 धावांची कर्णधारपदास साजेशी खेळी केली. तिने संजुलासमवेत पाचव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. 69 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 40 धावा केलेली संजुला धावबाद झाली. शिखाने नंतर विनवी गुरव हिच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 46 धावांची भर टाकली. विनवीने 58 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. 144 धावसंख्येवर शिखा सहाव्या विकेटच्या रुपात बाद झाली, तेथून गोव्याचा डाव 35 धावांची भर टाकून संपुष्टात आला. पूर्वा भाईडकर 22 धावांवर नाबाद राहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com