वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने प्रत्येक आघाडीवर वर्चस्व राखले. टीम इंडियाने पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला होता. प्रत्येक खेळाडूने संघाच्या विजयात आपले योगदान दिले होते. असे असूनही, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs West Indies, 2nd ODI) प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहे. वास्तविक केएल राहुल पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याची टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री होणार असल्याचे फिक्स मानले जात आहे. दुसऱ्या वनडेसाठी केएल राहुलनेही (KL Rahul) जोरदार सरावही सुरु केला आहे. अशा स्थितीत तो कोणत्या खेळाडूची जागा घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच केएल राहुलची फलंदाजी वेस्ट इंडिजविरुध्द (West Indies) कशी असणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Team Indias Playing 11 Will Change In The Second ODI)
दरम्यान, केएल राहुल टीम इंडियाचा सलामीवीर आहे, परंतु वनडे फॉरमॅटमध्ये संघाला त्याला मधल्या फळीत खेळवायचे आहे. त्याने मधल्या फळीत फलंदाजी केल्याने संघाचा समतोलही चांगला राहतो असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. केएल राहुलच्या आगमनाने गेल्या सामन्यात पदार्पण करणारा दीपक हुड्डाचा (Deepak Hooda) पत्ता कट होऊ शकतो, असे मानले जात आहे. इशान किशनचे (Ishan Kishan) नावही चर्चेत असले तरी इथे प्रश्न एवढाच आहे की, राहुल शेवटी कोणत्या पोजिशनवर खेळणार? राहुलला मिडिल ऑर्डरमध्ये खेळवले जाते.
केएल राहुलच्या आगमनाने फलंदाजीचा क्रम बदलेल का?
केएल राहुलच्या एंट्रीने टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डरही बदलेल. केएल राहुल जर मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळत असेल तर गेल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. दुसरीकडे, केएल राहुल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. तसेच, केएल राहुलने 4 आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर अधिक यशस्वी ठरला आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 56 पेक्षा जास्त सरासरीने 453 धावा केल्या आहेत. आणि त्याचा स्ट्राइक रेट देखील 113 पेक्षा जास्त आहे. या स्थानावर राहुलने 4 अर्धशतके आणि एक शतकही झळकावले आहे.
चौथ्या क्रमांकावर असलेल्या राहुलने 5 सामन्यात 40 च्या सरासरीने 160 धावा केल्या आहेत ज्यात एका शतकाचा समावेश आहे. राहुल दोन्ही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो हे स्पष्ट आहे, आता प्रश्न असा आहे की टीम इंडिया व्यवस्थापनाला त्याला कुठे खेळवायचे आहे?
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.