Murali Vijay Retirement: मुरली विजयची निवृत्तीची घोषणा, 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजयने मोठ्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Murali Vijay
Murali Vijay Dainik Gomantak
Published on
Updated on

Murali Vijay Retirement: भारताचा क्रिकेटपटू मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने जगाभरात क्रिकेटच्या नव्या संधी आणि त्याच्यासंबंधीत व्यावसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

38 वर्षीय मुरली विजयने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळले. त्याने निवृत्ती घेताना सर्वांचे आभारही मानले.

त्याने निवृत्तीची घोषणा करताना लिहिले की 'आज अतिशय कृतज्ञतेने आणि नम्रतेने मी सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. माझा 2002 ते 2018 ही सर्व वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे आहेत. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.'

Murali Vijay
IND vs NZ: संधी मिळताच चहलची जादू चालली, किवी ओपनरची विकेट ठरली रेकॉर्डब्रेक

तसेच मुरली विजयने पुढे लिहिले की 'मला हे सांगतानाही आनंद होत आहे की मी जगाभरात क्रिकेटच्या नव्या संधी आणि त्याच्यासंबंधीत व्यावसायाच्या संधींचा शोध घेणार आहे. मी मला आवडत असलेल्या खेळ (क्रिकेट) खेळत राहाणार आहे आणि स्वत:ला एका वेगळ्या आणि नवीन वातावरणात आव्हान देत राहिल.'

'मला विश्वास आहे की क्रिकेटपटू म्हणून माझ्या प्रवासातील हा पुढचा टप्पा असेल आणि मला माझ्या आयुष्यातील या नव्या आध्यायाबद्दल उत्सुकता आहे. मी माझ्या संघसहकाऱ्यांना आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.'

त्याचबरोबर त्याने त्याला संधी दिल्याबद्दल बीसीसीआय, तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि चेन्नई सुपर किंग्सचे आभार मानले आहेत. तसेच त्याने संघसहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि चाहत्यांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Murali Vijay
IND vs NZ, 2nd T20I: टीम इंडियाचा रडतखडत विजय! शंभरीसाठीही किवी गोलंदाजांनी सतवलं

काही दिवसांपूर्वीच मुरली विजयने बीसीसीआयवर निशाणा साधताना तो परदेशात संधी शोधत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याने डब्ल्यूव्ही रमण यांच्याशी बोलताना सांगितले होते की 'माझे बीसीसीआयबरोबर सर्व क्रिकेट खेळून झाले आहे आणि आता मी परदेशात संधी शोधत आहे. मला अजून थोडे स्पर्धांत्मक क्रिकेट खेळायचे आहे.'

दरम्यान, मुरली विजय भारताकडून अखेरचे 2018 साली खेळला होता. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या कसोटीत अखेरचे भारतीय जर्सीमध्ये दिसला होता. तसेच त्याने अखेरचा वनडे आणि टी20 सामना 2015 साली खेळला होता.

त्याने तमिळनाडूकडून 2019 साली अखेरचे सामने खेळले, तर आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून 2020 साली अखेरचे खेळताना दिसला होता.

त्याने आत्तापर्यंत कसोटीत 12 शतके आणि 15 अर्धशतकांसह 3982 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने 1 अर्शतकासह 339 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 169 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये 106 सामन्यात 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2619 केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com