बुमराहनंतर गोव्यात उडणार आणखी एका क्रिकेटरच्या लग्नाचा बार

टीम इंडियाचा फिरकीपटू राहुल चहर 9 मार्च रोजी गोव्यात फॅशन डिझायनर इशानी जोहरसोबत (Rahul Chahar) सात फेरे घेणार आहे.
Rahul Chahar & Ishani Johar
Rahul Chahar & Ishani JoharDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा फिरकीपटू राहुल चहर 9 मार्च रोजी गोव्यात फॅशन डिझायनर इशानी जोहरसोबत सात फेरे घेणार आहे. दोघांची दोन वर्षांपूर्वी जयपूरमध्ये एंगेजमेंट झाली होती. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नात अनेक खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. (Team India spinner Rahul Chahar is getting married to Ishani Johar in Goa)

दरम्यान, डेस्टिनेशन वेडिंगसाठी राहुल चहरचे कुटुंबीय गोव्याला (Goa) रवाना झाले आहेत. मंगळवारपासून पश्चिम गोव्यातील हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी मेहंदी सोहळा होणार आहे. बुधवारी दुपारी हळदी समारंभ होणार असून सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रात्री इतर विधी होतील आणि लग्नानंतर 12 मार्चला आग्रामधील हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंका (Sri Lanka) मालिकेत व्यस्त आहे. गोव्यासोबतच आयपीएल फ्रँचायझी संघांशी संबंधित अनेक खेळाडू आग्रा येथील रिसेप्शनला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राहुल चहरचा (Rahul Chahar) चुलत भाऊ क्रिकेटर दीपक चहर (Deepak Chahar) थेट गोव्यात पोहोचणार आहे.

तसेच, 22 वर्षीय राहुलने भारतासाठी आतापर्यंत एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे ज्यामध्ये त्याने 54 धावांत 3 विकेट घेतल्या आहेत. 23 जुलै 2021 रोजी तो श्रीलंकेविरुद्ध हा सामना खेळला होता. मात्र त्याला एकदिवसीय संघात संधी मिळालेली नाही. त्याच वेळी, त्याने 6 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यात त्याने एकूण 7 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची सर्वोत्तम कामगिरी 15 धावांत 3 विकेट आहे. राहुल चहरने 2019 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने या लीगमध्ये आतापर्यंत 42 सामन्यांमध्ये 43 विकेट घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 27 धावांत चार विकेट्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com