Team India reached at Lucknow for Match Against England in ICC ODI Cricket World Cup 2023:
भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय संघ साखळी फेरीतील त्यांचे सर्व सामने वेगवेगळ्या 9 मैदानांवर खेळणार आहे. आत्तापर्यंत चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे आणि धमरशाला येथे भारताचे सामने झाले आहेत. यानंतर आता भारताला या स्पर्धेतील सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना लखनऊला होणार आहे.
दरम्यान, या सामन्यापूर्वी भारताला 6 दिवसांच्या विश्रांतीचा कालावधी मिळाला. यादरम्यान काही दिवस भारतीय संघ धरमशाला येथेच थांबला होता. त्यानंतर बुधवारी (25 ऑक्टोबर) भारतीय संघ लखनऊला पोहचला.
लखनऊला भारतीय संघ पोहोचल्यानंतरचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की लखनऊला बसमधून उतरल्यानंतर भारतीय खेळाडूंचे हॉटेल स्टाफकडून स्वागत करण्यात आले.
भारत आणि इंग्लंड संघात रविवारी (29 ऑक्टोबर) सामना होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.
या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांना पराभूत केले आहे. त्यामुळे भारतीय संघ पाच पैकी पाच सामने जिंकून सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.
मात्र, असे असले तरी भारताला हार्दिक पंड्याच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. त्याला 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात स्वत:च्या गोलंदाजीवेळी चेंडू आडवताना दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे.
त्याचमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. तसेच भारताला केवळ ५ गोलंदाज घेऊन खेळावे लागले होते. आता असेही समोर येत आहे की हार्दिकची दुखापत थोडी गंभीर आहे. त्यामुळे तो भारताच्या पुढच्या तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
इंग्लंड - जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड विली, आदिल रशीद, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड, ब्रायडन कार्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.