भारताने वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिजचा पराभव केला (भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दुसरी वनडे). अवघ्या 237 धावा करुनही भारतीय संघाने पाहुण्यांना लक्ष्य गाठू दिले नाही. वेस्ट इंडिजचा संघ 46 षटकांत अवघ्या 193 धावांत गारद झाला. आणि टीम इंडियाने 44 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. कर्णधार निकोलस पूरनला मोठी खेळी उभारता आली नाही. शे होपने चांगली सुरुवात केली परंतु खराब शॉट खेळल्याने त्याची विकेट गेली. शेमराह ब्रूक्सने 44 धावांची इनिंग खेळली परंतु एका खराब शॉटमुळे त्याचाही डाव संपुष्टात आला. (Team India Defeated West Indies In The Second Match Of The ODI Series)
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. विशेषत: वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या पाच षटकांत केवळ 4 धावा देऊन 3 बळी घेतले. कृष्णाने सामन्यात 12 धावांत 4 बळी घेतले. शार्दुल ठाकूरने 2 बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 1-1 विकेट घेतली. दीपक हुडा (Deepak Hooda) आणि सिराज यांनाही 1-1 विकेट मिळाली.
खराब फलंदाजी करुनही भारत जिंकला
टीम इंडियाने नाणेफेक हरला. त्यामुळे विंडीजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 5 धावा करुन बाद झाला. यानंतर कोहली आणि पंतने क्रीजवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला, मात्र 12व्या षटकात दोघांनाही ओडिन स्मिथने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंत आणि कोहली दोघेही 18-18 धावा करुन बाद झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती, अशा वेळी सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. विशेषत: केएल राहुल (Kl Rahul) वेगाने धावा करताना दिसला. दोघांमध्ये 19 धावांची भागीदारी झाली. मात्र, 30व्या षटकात राहुल बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. राहुल 49 धावांवर धावबाद झाला.
त्यानंतर सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदरसोबत क्रीजवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमारने 70 चेंडूत दुसरे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 13 चेंडूंनंतर खराब शॉट खेळल्यामुळे त्याची विकेट गेली. सूर्यकुमारने 64 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदरही 24 धावा करुन बाद झाला. दीपक हुडाने महत्त्वाच्या वेळी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. हुडाने 25 चेंडूत 29 धावा केल्या. टीम इंडियाने 50 षटकात 237 धावा केल्या. ही धावसंख्याही वेस्ट इंडिजसाठी घातक ठरली. खराब फटके खेळण्याचा फटका पाहुण्या संघाला सहन करावा लागला. तसेच, भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.