U-19 World Cup: सुपर-6 मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी उडवला धुव्वा

U-19 World Cup: आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड कायम आहे. भारताने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध 214 धावांनी विजयी पताका फडकावली.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

U-19 World Cup: आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड कायम आहे. भारताने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध 214 धावांनी विजयी पताका फडकावली. सुपर 6 फेरीतील हा पहिला सामना होता. मॅनगाँग ओव्हल स्टेडियमवर भारताने 296 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि न्यूझीलंडचा संघ 81 धावांत आटोपला.

न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने सर्वाधिक 19 धावा केल्या. जॅक कमिंगने 16 आणि जेम्स नेल्सनने 10 धावा जोडल्या. विशेष म्हणजे, 6 खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही यावरुन न्यूझीलंडच्या खराब स्थितीचा अंदाज तुम्ही लावू शकता. भारताकडून सौम्या पांडेने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटकांत 19 धावा देत चार विकेट घेतल्या.

दरम्यान, राज लिंबानी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुशीरने शानदार फलंदाजीही केली. नाणेफेक हारल्यानंतर भारताने निर्धारित 50 षटकात 295/8 धावा केल्या, ज्यामध्ये मुशीरच्या शतकाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याने 126 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या होत्या.

सलामीवीर आदर्श सिंगने (52) अर्धशतक झळकावले. कर्णधार उदय सहारनने 34 तर अरावेली अवनीशने 17 आणि सचिन दासने 15 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. भारताला आता सुपर-6 मध्ये नेपाळविरुद्ध आपला पुढचा सामना खेळायचा आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताने बांगलादेशचा 84 धावांनी तर आयर्लंड आणि अमेरिकेचा 201 धावांनी पराभव केला.

Team India
U-19 World Cup: भारताची विजयी 'हॅट्ट्रिक', अमेरिकेला हरवून टेबल टॉपर बनला; सुपर-6 मध्ये मिळवले स्थान

न्यूझीलंडचा डाव

प्रत्युत्तरादाखल फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला म्हणावी तशी आपली छाप सोडता आली नाही. संघाने 28.1 षटके खेळली मात्र त्यांना केवळ 81 धावा करता आल्या. राज लिंबानीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर टॉम जोन्सला (0) क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्नेहित रेड्डी (0) LBW आऊट झाला. लिंबानीने पहिली ओव्हर मेडन टाकली.

यानंतर सौम्या पांडेने जेम्स नेल्सन (10), लचलान स्टॅकपोल (5), जॅक कमिंग (16) आणि रायन सोर्गस (0) यांना बाद केले. त्याचबरोबर फलंदाजीतही प्रावीण्य दाखवणाऱ्या मुशीरने गोलंदाजीमध्येही उत्कृष्टता कायम ठेवली. त्याने कर्णधार ऑस्कर जॅक्सन (19) आणि इवाल्ड श्रुडर (7) यांच्या रुपाने दोन बळी घेतले. नमन तिवारीने ऑलिव्हर तेवतिया (7) आणि अर्शिनने ॲलेक्स थॉम्पसन (12) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Team India
UICC U-19 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंनी झिम्बाब्वे संघाला केले 200 धावांत गारद

गुणतालिकेची स्थिती

भारताने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकले होते. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 84 धावांनी, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 201 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा 201 धावांनी पराभव केला. ग्रुप-ए मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर होती. ग्रुप ए आणि ग्रुप डी मधील अव्वल तीन संघांना सुपर सिक्स ग्रुप-1 मध्ये एकत्र ठेवण्यात आले आहे.

त्याचवेळी, सुपर सिक्सच्या ग्रुप-2 मध्ये, ग्रुप-बी आणि ग्रुप सी मधील अव्वल तीन संघांना एकत्र ठेवण्यात आले आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, नेपाळ आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. 'अ' गटातील अव्वल संघ सुपर सिक्समध्ये 'ड' गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांशी भिडणार आहे. त्याचप्रमाणे अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाचा सामना ड गटातील अव्वल आणि तिसऱ्या स्थानावरील संघांशी होईल. अशा स्थितीत न्यूझीलंडनंतर भारताचा सामना 2 फेब्रुवारीला नेपाळशी होणार आहे. सध्या भारतीय संघ सुपर सिक्समध्ये अव्वल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com