UICC U-19 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंनी झिम्बाब्वे संघाला केले 200 धावांत गारद

UICC U-19 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा मोठा विजय मोठा पराभव करून विजयी सुरुवात केली
Haseebullah Khan with a century in UICC U-19 World Cup
Haseebullah Khan with a century in UICC U-19 World CupTwitter/ICC
Published on
Updated on

पाकिस्तान क्रिकेट संघाने ICC अंडर - 19 विश्वचषकात (UICC U-19 World Cup) दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. या संघाने पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा 115 धावांनी पराभव केला. क गटातील दिएगो मार्टिन मैदानावर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या युवा खेळाडूंनी एकतर्फी खेळ दाखवत झिम्बाब्वेचा पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना हसिबुल्ला खानच्या 135 आणि इरफान खानच्या 75 धावांच्या जोरावर 50 षटकांत 9 गडी गमावून 315 धावा केल्या. या प्रचंड धावसंख्येसमोर झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 200 धावांत गारद झाला.

Haseebullah Khan with a century in UICC U-19 World Cup
Ashes मधील पराभवासाठी IPLला जबाबदार धरणाऱ्याला भारतीय प्रशिक्षक म्हणाले...

झिम्बाब्वेचा या विश्वचषकातील हा दुसरा सामना होता जरी या संघाने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली असली तरी दुसऱ्या सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वेने त्यांच्या पहिल्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा २२८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

हसीबुल्लाह, इरफाननंतर आवेश अली चमकला

हसीबुल्लाह आणि इरफान खान यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीच्या प्रदर्शनाने धुमाकूळ घातला, तर आवेश अलीने आपली उत्तम खेळी दाखवली. या गोलंदाजाने झिम्बाब्वेच्या सहा फलंदाजांना बाद केले. अलीने 8.4 षटके टाकली आणि 56 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय अहमद खान आणि झीशान जमीर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने 83 धावा केल्या. या फलंदाजाने आपल्या डावात 88 चेंडूंचा सामना करत 11 चौकार मारले आणि एक षटकारही मारला. त्याच्याशिवाय टेंडई माटारान्यिकाने 26 धावांची खेळी खेळली. सलामीवीर मॅथ्यू वेल्चलाही 26 धावांच्या पुढे जाता आले नाही. स्टीव्ह शॉलने 14 आणि डेव्हिड बेनेटने 13 धावा केल्या.

अशी होती पाकिस्तानची खेळी

झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसर्‍या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महंमद शहजादला 5 धावांनी बाद करून चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर हसीबुल्लाने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवायला सुरुवात केली. अब्दुल फसिहने त्याला साथ देत संघाची धावसंख्या 55 ​​पर्यंत पोहोचवली. येथे अब्दुल 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर हसीबुल्लाने इरफानसोबत भागीदारी करत शतक पुर्ण केले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली.

Haseebullah Khan with a century in UICC U-19 World Cup
FIH ने हॉकीच्या नियमांमध्ये केले दोन मोठे बदल, 18 महिन्यांच्या विचारमंथनानंतर निर्णय

इरफानचा डाव 255 धावांवर संपला. इरफानने 73 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. हसिबुल्लाचा डाव 272 धावांवर संपुष्टात आला. त्याने 155 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि चार षटकार ठोकले. येथून पुन्हा पाकिस्तानने सातत्याने विकेट गमावल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com