भारतीय क्रिकेट संघाने Kala Chashma वर थिरकत Zimbabwe विरूद्धचा विजय केला साजरा, पाहा व्हिडीओ

IND Vs ZIM: सर्व खेळाडु 'काला चष्मा' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
Zimbabwe| Indian Team
Zimbabwe| Indian TeamDainik Gomantak
Published on
Updated on

भारताने एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिका 3-0 अशी खिशात घातली. त्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये सर्व खेळाडू हा विजय साजरा करताना दिसले आहेत. उप कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) ने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

झिम्बाब्वेचा 13 धावांनी पराभव केल्यानंतर उप कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) ने इंस्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडु 'काला चष्मा' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Zimbabwe| Indian Team
CM Pramod Sawant : आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना नोकरी

तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 289 धावा केल्या. यादरम्यान शुभमन गिलने शतक झळकावले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 276 धावा करुन सर्वबाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने शतक झळकावले.

दरम्यान, भारताने (India) दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाकडून सिकंदर रझाने दमदार खेळी केली. त्याने शतक झळकावले. सिकंदरने 95 चेंडूत 115 धावा केल्या. शॉन विल्यम्सने 45 धावांचे योगदान दिले. त्याने 46 चेंडूत 7 चौकार मारले. सलामीवीर खेळाडू इनोसंट अवघ्या 6 धावा करुन बाद झाला. तर कॅटानोने 13 धावांचे योगदान दिले. रायन बर्ललाही फार काही करता आले नाही. तो 8 धावा करुन बाद झाला. ब्रॅड इव्हान्सने 37 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकारांचा समावेश होता.

दुसरीकडे, भारताकडून कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) शानदार गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात 38 धावा देत 2 बळी घेतले. दीपक चहरने 10 षटकात 75 धावा देत 2 बळी घेतले. अक्षर पटेलने आपला जलवा दाखवला. त्याने 10 षटकात केवळ 30 धावा देत 2 बळी घेतले. यासोबतच एक मेडन ओव्हरही त्याने टाकली. आवेश खानने 9.3 षटकात 66 धावा देत 3 बळी घेतले.

शिवाय, प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 विकेट गमावून 289 धावा केल्या. यादरम्यान शुभमन गिलने शतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 130 धावा केल्या. तर ईशान किशनने अर्धशतक झळकावले. ईशानने 61 चेंडूत 50 धावा केल्या. शिखर धवनने 40 धावांचे योगदान दिले. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) 30 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. संजू सॅमसन 15 धावांनंतर बाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com