India vs Sri Lanka, 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये सध्या वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता चालू होणार आहेत. या सामन्यादरम्यान भारतीय संघ एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घालू शकतो.
भारतीय संघाने जर तिसरा वनडे सामना जिंकला, तर त्यांचा श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध वनडे क्रिकेट प्रकारातील 165 सामन्यांतील 96 वा विजय असेल. त्यामुळे वनडेमध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल क्रमांकावर येईल.
सध्या वनडेत एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध 95 वनडे सामन्यात विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध 95 वनडे विजय मिळवले आहेत.
या यादीत भारत आणि ऑस्ट्रेलियापाठोपाठ पाकिस्तान क्रिकेट संघ आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच 92 वनडे सामन्यांत विजय मिळवले आहेत.
वनडेत एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ (14 जानेवारी 2023 पर्यंत आकडेवारी)
95 विजय - भारत विरुद्ध श्रीलंका
95 विजय - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
92 विजय - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
87 विजय - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
80 विजय - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
भारताला निर्भेळ यश मिळवण्याची संधी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. पहिला सामना भारताने 67 धावांनी जिंकला होता. तसेच दुसरा सामना 4 विकेट्सने भारताने जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.
अशात भारतीय संघाला तिसरा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याची संधी आहे. तसेच श्रीलंका संघासमोर तिसरा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असणार आहे. हा सामना श्रीलंकेचा भारत दौऱ्यातील अखेरचा सामना आहे.
या मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळायची आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.