Gold Medal : तायक्वांदोत गोव्याला दोन सुवर्णपदके

रोदाली बरुआ हिने ७३+ किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले. तिने कर्नाटकच्या व्ही. प्रावालिका कुस्तगी हिच्यावर मात केली.
Taekwondo
TaekwondoDainik Gomantak
Published on
Updated on

Gold Medal : पणजी, गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळास वगळण्यात आले होते, परिणामी गोव्याला पदके हुकली होती. गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या खेळाने पुनरागमन केले आणि राज्याने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदकांना गवसणी घातली.

स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात राज्यासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकताना आनंद पंडियाराजन याने ८७+ किलो वजनगटात बाजी मारली. आनंदने हरियानाच्या आर. प्रीतम याच्यावर मात केली.

पुरुष गटात गोव्याला ८० खालील किलो वजन गटात रौप्यपदही मिळाले. सर्वन कुमार याने हे पदक पटकावले. त्याला अंतिम लढतीत दिल्लीच्या शिवांश त्यागी याने हरविले. महिला गटातही गोव्याची सरशी झाली. रोदाली बरुआ हिने ७३+ किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले. तिने कर्नाटकच्या व्ही. प्रावालिका कुस्तगी हिच्यावर मात केली.

Taekwondo
Ponda News: फोंडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; 22 वर्षीय युवकास अटक

तायक्वांदो स्पर्धेत शुक्रवारी गोव्याला पाठिंबा देण्यासाठी फोंडा क्रीडा संकुलात पाठिराख्यांचा मोठा गट उपस्थित होता. आनंदने लौकिकास साजेशी कामगिरी करताना उपस्थितांनी निराश केले नाही.

यापूर्वी तो ८० किलो वजनगटात खेळत असे, आता वजनगट वाढूनही त्याने सुवर्णविजेत्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. यापूर्वी त्याने २०११ व २०१५ मधील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१५ साली रौप्यपदक जिंकलेल्या सर्वन कुमार याने दुसऱ्यांदा रुपेरी कामगिरी बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com