Syed Mushtaq Ali T-20: दीपराजच्या झंझावातामुळे गोव्याचा विजय; रेल्वे संघावर 3 चेंडू राखून मात

22 चेंडूंत फटकावल्या नाबाद 51 धावा; सुयश प्रभुदेसाईची अर्धशतक
दीपराज गावकर
दीपराज गावकरDainik Gomantak
Published on
Updated on

Syed Mushtaq Ali T-20 Trophy 2023: दीपराज गावकर याने कारकिर्दीतील सर्वोत्तम स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन सोमवारी रांची येथे केले. त्याने झंझावाती फलंदाजी करताना अवघ्या 22 चेंडूंत तीन चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या.

या खेळीमुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याला रेल्वे संघावर दोन गडी राखून विजय नोंदविता आला.

रेल्वे संघाने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर 7 बाद 199 धावा केल्या. नंतर डावातील तीस चेंडू बाकी असताना गोव्याला विजयासाठी 58 धावांची गरज होती आणि फक्त दोन विकेट बाकी होत्या.

दीपराज गावकर
National Games 2023: आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये सेनादलाला सुवर्ण

दीपराजने रेल्वेच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविताना गोव्याला डावातील तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला. दीपराजने मोहित रेडकर याच्यासमवेत नवव्या विकेटसाठी 27 चेंडूंत 58 धावांची अभेद्य भागीदारी केली. यामध्ये दीपराजच्या 19 चेंडूंतील 50 धावा होत्या.

जम बसलेला सुयश प्रभुदेसाई (58, 41चेंडू, 3 चौकार, 4 षटकार) 15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर दीपराजने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. दीपराजने क्षेत्ररक्षणात तीन झेलही पकडले.

स्पर्धेतील चौथा विजय

गोव्याचा संघ आता स्पर्धेत पाच सामने खेळला असून त्यांनी चार लढतीत विजय नोंदविले आहेत. रेल्वेला नमविण्यापूर्वी दर्शन मिसाळच्या नेतृत्वाखालील संघाने अनुक्रमे आंध्र, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या संघांना नमविले होते.

गुजरातकडून त्यांना हार पत्करावी लागली. क गटात आता त्यांचे पंजाब व सौराष्ट्रविरुद्धचे सामने बाकी आहेत.

दीपराज गावकर
Rohit Sharma: टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! रोहित ODI क्रिकेटमध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

संक्षिप्त धावफलक

रेल्वे ः 20 षटकांत 7 बाद 199 (शिवम चौधरी 50, महंमद सैफ 43, आशुतोष शर्मा 28, उपेंद्र यादव 48, अर्जुन तेंडुलकर 4-0-50-2, शुभम तारी 4-0-36-1, लक्षय गर्ग 4-0-33-3, दर्शन मिसाळ 4-0-33-1, दीपराज गावकर 2-0-23-0, सुयश प्रभुदेसाई 1-0-12-0, मोहित रेडकर 1-0-10-0)

पराभूत वि. गोवा ः 19.3 षटकांत 8 बाद 200 (ईशान गडेकर 8, राहुल त्रिपाठी 12, के. व्ही. सिद्धार्थ 25, सुयश प्रभुदेसाई 58, दर्शन मिसाळ 19, विकास सिंग 0, अर्जुन तेंडुलकर 17, तुनीष सावकार 1, दीपराज गावकर नाबाद 51, मोहित रेडकर नाबाद 7, युवराज सिंग 2-53, राहुल शर्मा 2-39, कर्ण शर्मा 3-36).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com