National Games 2023: आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये सेनादलाला सुवर्ण

उत्तर प्रदेशला रौप्य तर हरियाणाला ब्राँझपदक
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकलेला सेनादलाचा संघ.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकलेला सेनादलाचा संघ.Dainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games 2023 Goa: गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकलेल्या सेनादलाने सोमवारी गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकांचे खात सुवर्णासह उघडले. त्यांनी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये अव्वल कामगिरी नोंदविली.

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला सोमवारपासून पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरवात झाली. सेनादलाने सर्वाधिक 249.35 गुण नोंदविले. उत्तर प्रदेशला एकूण 242.10 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर हरियानाने 240.35 गुणांसह ब्राँझपदक मिळाले.

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकलेला सेनादलाचा संघ.
Rohit Sharma: टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! रोहित ODI क्रिकेटमध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

सुवर्णपदक विजेत्या सेनादलाचे अभिजित कुमार, अनास अली शेख, गौरव कुमार, राकेशकुमार पत्रा, सैफ सादिक तांबोळी, तापेश्वरनाथ दास यांनी प्रतिनिधित्व केले.

बास्केटबॉलमध्ये दिल्लीची गोव्यावर

नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सोमवारपासून बास्केटबॉल स्पर्धेला सुरवात झाली. दिल्लीने यजमान गोव्यावर 81-61 अशा 20 गुणफरकाने सहज मात केली. दिल्लीच्या विजयात जोगिंदर सिंग याने सर्वाधिक 24 गुणांची नोंद केली.

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकलेला सेनादलाचा संघ.
Bishan Singh Bedi: 'सरदार ऑफ स्पिन' बिशन सिंग बेदी यांची कशी होती कारकिर्द? पाहा आकडेवारी

याशिवाय विशेष भृगुवंश याने 18, तर रचित याने 15 गुण नोंदविले. विशेष याने अष्टपैलू चमक दाखविताना सहा असिस्टचीही नोंद केली. गोव्यातर्फे खेळणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिपाल भाटी याने 20 गुण नोंदवून एकहाती किल्ला लढविला. जेशुआ पिंटो याने 12 गुणांची नोंद केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com