T20 वर्ल्डकप फायनलमधील SKY चा ऐतिहासिक कॅच; गणेश मंडळानं अशी बनवली 'थीम'; पाहा फोटो...
suryakumar yadav@mufaddal_vohra

T20 वर्ल्डकप फायनलमधील SKY चा 'तो' ऐतिहासिक कॅच; गणेश मंडळानं अशी बनवली थीम; पाहा फोटो...

Ganesh Festival: क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्या सणापेक्षा कमी नाही. क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा देण्यात क्रिकेट चाहते मागेपुढे पाहत नाहीत.
Published on

क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्या सणापेक्षा कमी नाही. क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा देण्यात क्रिकेट चाहते मागेपुढे पाहत नाहीत. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर, ज्याला चाहते 'क्रिकेटचा देव' म्हणतात. दरम्यान, आता असाच काहीसा नजारा भारतीय क्रिकेटपटू आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याशी संबंधित पाहायला मिळाला आहे.

ICC मेन्स T20 वर्ल्डकप 2024 चा फायनल सामना भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस येथील किंग्स्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती आणि डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. तर शेवटचे षटक हार्दिक पांड्या टाकण्यासाठी सज्ज होता. हार्दिकने पहिलाच बॉल मिलरला फुलटॉस टाकला, मात्र मिलर टाइम करु शकला नाही. सीमारेषेवर उभ्या असलेल्या सूर्याने मिलरचा अप्रतिम झेल घेतला, जो नंतर सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

आता गणेशोत्सवात सूर्याच्या या कॅचशी संबंधित पंडालची थीम असलेला फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा फोटो गुजरातमधील वापी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेटप्रेमी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सूर्याबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्यात आले. आता तो बांगलादेशच्या भारत दौऱ्यावर सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बांगलादेशविरुद्ध सूर्या आपला जलवा दाखवणार की नाही हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com