Sarfaraz Khan: टीम इंडियात निवड झालेल्या सर्फराजसाठी सूर्याची खास पोस्ट; म्हणाला, 'उत्सवाची तयारी करा...'

Suryakumar Yadav: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी सर्फराज खानला भारतीय संघात सामील करण्यात आल्यानंतर त्याच्यासाठी मुंबई संघातील संघसहकारी सूर्यकुमारने खास पोस्ट केली आहे.
Suryakumar Yadav - Sarfaraz Khan
Suryakumar Yadav - Sarfaraz KhanX/BCCI
Published on
Updated on

Suryakumar Yadav Special Post after Sarfaraz Khan earns maiden India call-up for Test against England:

भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही वर्षापासून एक नाव सातत्याने चर्चेत होते, ते नाव म्हणजे मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खान. त्याने गेल्या काही वर्षात खोऱ्याने धावा काढल्या आहेत, पण त्याला भारतीय संघात अद्याप संधी मिळाली नव्हती.

परंतु, अखेर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्याला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही सर्फराजचे अभिनंदन करताना खास पोस्ट शअर केली आहे. सूर्यकुमार मुंबई संघातील सर्फराजचा संघसहकारी देखील आहे.

Suryakumar Yadav - Sarfaraz Khan
IND Vs ENG: सर्फराज खानला टीम इंडियात संधी मिळताच वडीलांचा आनंद गगनात मावेना; म्हणाले...

सूर्यकुमारने मुंबई संघाच्या जर्सीतील सर्फराजबरोबरचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला असून त्यावर कॅप्शन लिहिले आहे की 'मिडन कॉल अप (पहिली संधी). उत्सवाची तयारी करा.' त्याची ही स्टोरी सर्फराजने रिपोस्टही केली आहे.

Suryakumar Yadav - Sarfaraz Khan
Suryakumar Yadav - Sarfaraz KhanInstagram

सर्फराज गेल्या काही वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो नुकताच भारतीय अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध चालू असलेल्या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला. त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक केले होते, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 161 धावांची शतकी खेळी केली होती.

तसेच सर्फराजने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत 45 सामने खेळले असून 69.85 च्या सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

Suryakumar Yadav - Sarfaraz Khan
IND vs ENG: बुमराहवर ICC कडून मोठी कारवाई! इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान झाली 'ही' चूक

केएल राहुल - जडेजा बाहेर

इंग्लंडविरुद्ध 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला चालू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून भारताचा मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा बाहेर झाले आहेत.

जडेजाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे, तर केएल राहुलने मांडीत वेदना होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, दुसऱ्या सामन्यातून केएल राहुल आणि रविंद्र जडेजा बाहेर झाल्यानंतर भारतीय संघाच्या निवड समितीने तीन नव्या खेळाडूंना संघात सामील केले आहे. सर्फराजसह सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com