`सुपर सब` पंडितामुळे जमशेदपूर अव्वल, ईस्ट बंगालला हरवले

ईशान पंडिताचे हेडिंग भेदक ठरले आणि जमशेदपूर संघाचे पूर्ण तीन गुण निश्चित झाले. त्यांचा हा 11 सामन्यातील पाचवा विजय ठरला
ISL Football
ISL FootballDainik gomantak
Published on
Updated on

पणजी : ईशान पंडिता पुन्हा एकदा उपयुक्त सुपर सब ठरला. या बदली आघाडीपटूने सामन्यातील दोन मिनिटे बाकी असताना गोल नोंदवल्यामुळे जमशेदपूर एफसीला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी रात्री अग्रस्थान प्राप्त करता आले.

जमशेदपूर (Jamshedpur) एफसीने झुंजार ईस्ट बंगालला 1-0 फरकाने निसटते हरविले. बांबोळी येथील एथलेटिक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ईस्ट बंगालचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य सेटपिसवर फसला. सामन्याचा मानकरी ठरलेल्या ग्रेग स्टुअर्टच्या अप्रतिम कॉर्नर फटक्यावर ईशान पंडिताचे हेडिंग भेदक ठरले आणि जमशेदपूर संघाचे पूर्ण तीन गुण निश्चित झाले. त्यांचा हा 11 सामन्यातील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 19 गुण झाले असून त्यांनी केरळा ब्लास्टर्स व मुंबई सिटी संघावर दोन गुणांची आघाडी घेतली.

ISL Football
Under-19 World Cup 2022: भारताचे दोन हिरे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळणार!

ईस्ट बंगालला (Bengal) सलग चार बरोबरीनंतर स्पर्धेतील एकंदरीत पाचवा पराभव पत्करावा लागला. 11 लढतीनंतर सहा गुणांसह त्यांचे शेवटचे अकरावे स्थान कायम राहिले. 88 व्या मिनिटास स्वीकारलेला गोल वगळता अंतरिम प्रशिक्षक (Instructor) रेनेडी सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने झुंजार खेळ केला. बचावफळीतील भक्कम कामगिरी करताना त्यांनी जमशेदपूरला जास्त मोकळीक दिली नव्हती.

किमयागार ईशान पंडिता

जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी सामन्याच्या 58 व्या मिनिटास ईशान पंडिता याला सेईमिन्लेन डुगेल याच्या जागी संधी दिली. या 23 वर्षीय आघाडीपटूने पुन्हा एकदा उपयुक्तता सिद्ध केली. मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध त्याने 90+3 व्या मिनिटास मॅचविनर गोल केला होता. मंगळवारीही त्याने असाच पराक्रम साधत निवड सार्थ ठरविली. गतमोसमात एफसी गोवातर्फे खेळताना पंडिता बदली खेळाडू या नात्याने गोल नोंदवून प्रकाशझोतात आला होता. यंदा त्याने 8 सामन्यांत 2, तर एकूण 12 आयएसएल (ISL) सामन्यांत 5 गोल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com