'या' युवा फलंदाजामध्ये सुनील गावस्कर पाहत आहेत एक महान खेलाडू

sunil gavskar.jpg
sunil gavskar.jpg
Published on: 
Updated on: 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championsiop) अंतिम सामन्यात भारताचा युवा बॅट्समन शुभमन गिल  (Shubhman Gill) पहिल्या डावात फक्त 28 धावा करून बाद झाला. गिलने कदाचित अर्धशतक (Half century) ठोकले नसले तरी आगामी काळात तो एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येईल असा विश्वास भारतीय संघाचाचे  माजी फलंदाज (Batsman) सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केला आहे. गिलने कसोटी स्वरूपात पदार्पण केल्याला फार काळ झालेला नाही, तरीही त्याने सर्वात प्रदीर्घ स्वरूपात आपला ठसा उमटविला आहे.(Sunil Gavaskar is seen as a great player in Shubhman Gill )

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम दिवसाचा पहिला दिवस पावसात धुऊन झाल्यावर न्यूझीलंडने (New Zealand) टॉस जिंकून दुसर्‍या दिवशी भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही भारतीय ओपनर  शुभमन गिल आणि रोहित शर्मा (Rohit sharma) यांनी पहिल्या विकेटसाठी  62 धावांची भागीदारी केली. नील वॅग्नरच्या बॉलवर शुभमन गिल 28 धावांवर बाद झाला.

गावस्कर यांनी गिलला भविष्यातील महान फलंदाज असं म्हंटल 
गिलच्या खेळावर सुनील गावस्कर खूप प्रभावित झाले होते. कमेंट्री बॉक्समध्ये  सुनील गावस्कर म्हणाले की, 'शुभमन गिलकडे भविष्यात एक महान फलंदाज होण्यासाठी सर्व गुण आहेत. त्याने अद्याप शतक केले नसले तरी लयीत जाण्यासाठी खेळाडूला मोठ्या इनिंग ची गरज असते. पहिले शतक हे नेहमीच कठीण असते कारण अर्धशतक ठोकण्यापासून ते तीन आकड्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास इतका सोपा नाही. 70-80 धावा केल्यावर फलंदाज असा समजतो की त्याचे डोळे पूर्णपणे गोठलेले आहेत. यानंतर फलंदाजांविरूद्ध फटकेबाजी सुरू होते. या प्रकरणात बऱ्याच वेळा विकेट गमवावी लागते . शुमनला फक्त शतकाची गरज आहे, त्यानंतर त्याला रोखणे सोपे नाही.

नासिर हुसेन यांनीही  केले कौतुक 
गावस्कर नंतर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर (Nasser Hussain) यांनीही गिलचे कौतुक केले. ते म्हणाले  की गिलने रोहितबरोबर शानदार फलंदाजी केली. ते  म्हणाले , 'या दोघांसारखं आधी कोणत्याही भारतीय ओपनिंगच्या जोडीने लहान बॉल इतका चांगला खेळला होता हे मला आठवत नाही. या दोघांना शॉर्ट बॉलने घाबरू शकत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. अशा परिस्थितीत गिलसाठी हा डाव आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rohit Sharma Karisma Kapoor Dance Video
Rohit Sharma Mumbai Indians captain 2027
IND vs NZ Ishan Kishan Ruled Out
Rohit Sharma Debunks Retirement Rumors
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com