Sunil Gavaskar: 'रोहितलाही श्रेय द्या, जसे धोनीला...', गावसकरांचे कॅप्टन्सीबद्दल मोठे भाष्य

सुनील गावसकरांनीही रोहित शर्मालाही श्रेय द्या असे म्हणत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Gavaskar | MS Dhoni | Rohit Sharma
Sunil Gavaskar | MS Dhoni | Rohit SharmaDainik Gomantak

Sunil Gavaskar feel Rohit Sharma doesn't get the credit for his captaincy: भारतात क्रिकेट संघाच्य कर्णधापदाबाबत नेहमीच चर्चा घडत असतात. सध्या भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. पण नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यामते रोहित शर्माला ज्याप्रकाने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला श्रेय दिले जाते, तसे मिळत नाही.

रोहितने मुंबई इंडियन्सला त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. नुकेतच सध्या सुरू असेलल्या आयपीएल 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात रोहितने आकाश मधवालला संधी दिल्याबद्दल अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. मधवालने रोहितचा विश्वास सार्थकी लावताना 5 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या

Sunil Gavaskar | MS Dhoni | Rohit Sharma
चेन्नईविरुद्ध कोण खेळणार IPL Final? आज होणार निर्णय...! पाहा मुंबई - गुजरातची संभावीत Playing XI

पण, याबद्दल बोलताना गावसकरांनी म्हटले आहे की रोहितला फारसे श्रेय मिळत नाही. ते इंडिया टूडेशी बोलताना म्हणाले, नक्कीच तो अंडररेटेड आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी ५ वेळा विजेतीपदे जिंकली आहेत.'

'मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मधवालने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आयुष बदोनीला बाद केले. त्यानंतर त्याने डावखुऱ्या निकोलस पूरनविरुद्ध राऊंड द विकेट गोलंदाजी केली.'

'अनेक गोलंदाज असे करतातच असे नाही. कारण जर त्यांना ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना लय मिळाली, तर ते तशीच गोलंदाजी करतात. ते डावखुऱ्या फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण तो राऊंड द विकेट गोलंदजी करायला गेला आणि त्याने एक शानदार चेंडू टाकला आणि पूरनला बाद केले.'

Sunil Gavaskar | MS Dhoni | Rohit Sharma
IPL 2023: ईशान किशनने केला मोठा कारनामा, सचिन-रोहितच्या स्पेशल क्लबमध्ये धाकड 'एन्ट्री'

गावसकर पुढे म्हणाले, 'जर असे चेन्नई सुपर किंग्स संघात आणि एमएस धोनी कर्णधार झाले असते, तर सर्वांनी म्हटले असते की धोनीने निकोलस पूरनच्या विकेटसाठी सापळा रचला. मोठ्या प्रमाणात हेच घडते. थोडासा हाईप देखील केला जाचो आणि गोष्टी कधी कधी काम करतात,

'काही परिस्थितीत सुद्धा नेतृत्व गरजेचे असेते. एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत असताना नेहल वढेराला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आले होते. साधारणत: प्रथम फलंदाजी करणार संघ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजाला वापरत नाही. पण रोहितने वढेलाराला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवले. त्यामुळे त्यालाही श्रेय द्या.'

दरम्यान, सध्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मधील एलिमिनेटर सामना जिंकत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com