Dhruv Jurel: '... म्हणून म्हणालो जुरेल एमएस धोनीसारखा', सुनील गावसकरांनी दिलं स्पष्टीकरण

Sunil Gavaskar on Dhruv Jurel: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची एमएस धोनीशी तुलना करण्याबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Sunil Gavaskar | Dhruv Jurel | MS Dhoni
Sunil Gavaskar | Dhruv Jurel | MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

Sunil Gavaskar clarifies why he compared Dhruv Jurel to MS Dhoni

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसरांनी काही दिवसांपूर्वी 23 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचे कौतुक करताना म्हटले होते की आणखी एक एमएस धोनी तयार होत आहे. आता त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये झाला होता. रांचीमध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे घर आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात जुरेलने मोलाचा वाटा उचलला होता. त्याने या सामन्यात 90 आणि नाबाद 39 धावांची खेळी केली होती. त्याला या सामन्यातील सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले होते.

Sunil Gavaskar | Dhruv Jurel | MS Dhoni
Dhruv Jurel: 'धोनीला धोनी होण्यासाठी 15 वर्षे लागले, त्यामुळे...', जुरेलबद्दल बोलताना गांगुलीने स्पष्टच सांगितलं

या सामन्यादरम्यान समालोचन करत असताना गावसकरांनी जुरेलची धोनीशी तुलना केली होती. याबद्दल बरीच चर्चा झाली.

आता याबद्दल स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाले, 'तो ज्याप्रकारे सामन्याबद्दल विचार करतो, तो परिस्थिती समजून घेतो आणि त्यानुसार ज्याप्रकारे फलंदाजी करतो, ते पाहून मला एमएस धोनी आठवतो. तो मध्ये षटकार मारू शकतो आणि एकेरी-दुहेरी धावा काढून स्ट्राईक रोटेट करत राहू शकतो.'

'अगदी यष्टीरक्षणातही, त्याने थ्रो पकडून बेन डकेटला अफलातून पद्धतीने धावबाद केले आणि जेम्स अँडरसन रिव्हर्स स्विप मारत असताना शानदार झेल घेतला.'

'जेव्हा एमएस धोनी त्याच्या वयाचा होता, तेव्हा त्याच्याकडेही अशीच परिस्थितीची जाण होती. आणि म्हणूनच मी म्हणालो, जुरेल एमएस धोनीसारखा आहे. कोणीही एमएस धोनी बनू शकत नाही. एमएस धोनी एकच आहे. पण धोनीने केलेल्या कामगिरीच्या थोडी जरी कामगिरी जुरेल करू शकला, तरी ते भारतीय क्रिकेटसाठी चांगले राहिल.'

Sunil Gavaskar | Dhruv Jurel | MS Dhoni
Dhruv Jurel: 'पंतने लवकर परत यावे, पण जुरेलकडे धोनीपर्यंत पोहोचण्याची क्षमता', माजी कर्णधाराचा विश्वास

टी20 वर्ल्डकपसाठीही चांगला पर्याय - गावसकर

इतकेच नाही, तर गावसकर यांनी असेही म्हटले की जर जुरेलसाठी आयपीएल 2024 स्पर्धा चांगली राहिली, तर तो आगामी टी20 वर्ल्डकपसाठीही एक पर्याय ठरू शकतो.

गावसकर म्हणाले, 'जुरेल नक्कीच एक चांगला पर्याय आहे. त्याच्या आयपीएलमधील फॉर्मवरीही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. पण तो ज्या सहजतेने षटकार मारतो, त्यातून दिसते की छोट्या क्रिकेट प्रकारातही खेळण्याची त्याची क्षमता आहे.

जर त्याला संधी मिळाली, तर तो फिनिशर म्हणून 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. आपण पाहिले आहे की धोनी कशाप्रकारे त्या क्रमांकावर शेवटच्या 4-5 षटकात फलंदाजीला यायचा, त्याच आपेक्षा जुरेकडून ठेवू शकतो.'

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जूनमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com