जीएफए फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवाची दमदार कामगिरी

जीएफए सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाविरुद्ध पिछाडीवरून गुण
Strong performance of Sporting Club The Goa in GFA Football Tournament
Strong performance of Sporting Club The Goa in GFA Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः सामन्याच्या भरपाई वेळेत गोल नोंदवत गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने जीएफए सुपर लीग फुटबॉल (Football) स्पर्धेत पिछाडीवरून एफसी गोवास 2-2असे गोलबरोबरीत रोखले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सोमवारी झालेल्या या लढतीत स्पोर्टिंग क्लब 90 व्या मिनिटापर्यंत दोन गोलने मागे होता.

Strong performance of Sporting Club The Goa in GFA Football Tournament
पोलीस उपअधीक्षक आणि निरीक्षकांची तडकाफडकी बदली

व्हेलरॉय फर्नांडिसने 24 व्या, तर मलिकजान कलेगर याने 47 व्या मिनिटास केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे एफसी गोवा (FC Goa) संघाची स्थिती मजबूत होती. त्यापूर्वी सामन्याच्या आठव्या मिनिटास व्हेलरॉयचा गोल ऑफसाईड ठरला होता. 90 व्या मिनिटास बदली खेळाडू रिची वाझ याने स्पोर्टिंग क्लबची पिछाडी एका गोलने कमी केली. नंतर 90+3व्या मिनिटास स्टेन्डली फर्नांडिसने केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंगला पराभव टाळता आला व त्यांना एका गुणाची कमाई करता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com