Sl vs Eng : श्रीलंकेकडून गतविजेत्या इंग्लंडचा धुव्वा ; १५६ धावांत शरणागती

श्रीलंकेने हा सामना आपल्या अंधूक आशांना संजीवनी दिली, तर इंग्लंडचे आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
Srilankan Player
Srilankan PlayerDainik Gomantak
Published on
Updated on

SL vs Eng : बंगळूर, गेल्या चार विश्वकरंडक स्पर्धांत इंग्लंडवर मिळवलेल्या विजयाची परंपरा श्रीलंकेने थाटात कायम राखली. या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात तर गतविजेत्यांचा धुव्वा उडवला. श्रीलंकेने हा सामना आपल्या अंधूक आशांना संजीवनी दिली, तर इंग्लंडचे आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

सलग दोन सामन्यांत इंग्लंडच्या फलंदाजीची दाणादाण उडाली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा डाव १७० धावांत संपुष्टा आला होता.

आज बंगळूरमध्ये त्यांनी श्रीलंकेसमोर १५६ धावांत शरणागती स्वीकारली. हे माफक आव्हान श्रीलंकेने २५.४ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून आपला दुसरा विजय मिळवला.

गतविजेते असूनही इंग्लंड फलंदाजीची दैना होत आहे. यंदाच्या स्पर्धेतील त्यांची तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. बिनबाद ४५ वरून त्यांचा संपूर्ण संघ १५६ धावांत गारद झाला, म्हणजेच ९१ धावांत त्यांनी दहा फलंदाज गमावले. त्यात बेन स्टोक्सच्या ४३ धावांचा समावेश आहे.

बेअरस्टॉ आणि मलान यांनी ४५ धावांची सलामी दिल्यानंतर इंग्लंडने निम्मा संघ ८५ धावांत गमावला, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती.

त्यानंतर स्टोक्स आणि मोईन अली यांनी ३७ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु २५ व्या षटकात मोईल अली बाद झाल्यावर इंग्लंडची पुन्हा घसरगुंडी उडाली. त्यांचा डाव ३३.२ षटकेच चालला.

गोलंदाजांनी अर्ध्याहून अधिक लढाई जिंकून दिल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी पुढचे काम सोपे होते; परंतु २३ धावांत कुशल परेरा आणि कुशल मेंडीस बाद झाल्यामुळे थोडेसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पाथून निसांका (७७) आणि सदिरा समरविक्रमा (६५) यांनी नाबाद १३७ धावांची नाबाद भागीदारी करून मोहीम फत्ते केली.

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड ः ३३.२ षटकांत सर्वबाद १५६ (बेअरस्टॉ ३०, मलान २८, बेन स्टोक्स ४३, मोईन अली १५, रजिता ७-०-३६-२, अँजेलो मॅथ्यूज ५-१-१४-२, लाहिरू कुमारा

Srilankan Player
England Cricket: गतविजेत्या इंग्लंडसाठी दुष्काळात तेरावा! प्रमुख वेगवान गोलंदाज वर्ल्डकपमधून बाहेर

नीचांकी धावसंख्या

८८ ः दाम्बुला २००३

१४३ ः दाम्बुला २००१

१५६ ः बंगळूर २०२३

१८० ः मोरातुवा १९९३

वर्ल्डकपमधील इंग्लंडची या दशकातील नीचांकी धावसंख्या

१२३ ः वि. न्यूझीलंड (वेलिंग्टन २०१५)

१५४ ः वि. दक्षिण आफ्रिका (ब्रिजटाऊन २००७)

१५६ ः वि. श्रीलंका (बंगळूर २०२३)

१६८ ः वि. भारत (डर्बन २००३)

या वर्ल्डकपमधील आत्तापर्यंतची नीचांकी धावसंख्या

९० ः नेदरलँड्स वि. ऑस्ट्रेलिया (दिल्ली)

१३९ ः अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड (चेन्नई)

१५६ ः अफगाणिस्तान वि. बांगलादेश (धरमशाला)

१५६ ः इंग्लंड वि. श्रीलंका (बंगळूर)

१७० ः इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका (वानखेडे)

वर्ल्डकपमधील गेल्या चार आणि यंदाच्या सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेकडून पराभव

२००७, २०११, २०१५, २०१९ आणि २०२३ ः श्रीलंकेचे विजय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com