World Cup 2023: 16 वर्षांनंतरही इंग्लंडसाठी श्रीलंकेची भिंत अभेद्यच! गतविजेत्यांचा पराभवाचा चौकार

England vs Sri Lanka: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इंग्लंडला श्रीलंकेने 8 विकेट्सने पराभवाचा मोठा धक्का दिला आहे.
England vs Sri Lanka
England vs Sri Lanka
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, England vs Sri Lanka Match Result:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (26 ऑक्टोबर) 25 वा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात झाला. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. श्रीलंकेचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे.

मात्र, गतविजेत्या इंग्लंडवर सलग तिसरा, तर या स्पर्धेतील एकूण चौथा पराभव स्विकारण्याची नामुष्की ओढावली आहे. दरम्यान, गेल्या १६ वर्षात सलग ५ व्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे.

यापूर्वी वनडे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने श्रीलंकेला 1999 मध्ये पराभूत केले होते. त्यानंतर 2003 वर्ल्डकपमध्ये या दोन संघात सामना झाला नव्हता. त्यानंतर गेल्या 16 वर्षात झालेल्या 2007, 2011, 2015, 2019 आणि आता 2023 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेने इंग्लंड विरुद्ध विजय मिळवले आहेत.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडला श्रीलंकेसमोर 157 धावांचेच आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग श्रीलंकेने 25.4 षटकात 2 विकेट्स गमावत 160 धावा करून पूर्ण केला.

England vs Sri Lanka
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने सलग तिसरी मॅचच जिंकली नाही, तर वर्ल्डकपमध्ये नवा इतिहास रचलाय!

इंग्लंडने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कुशल परेरा फलंदाजीला उतरले होते.पण परेरा 4 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार कुशेल मेंडिसही 11 धावांवर स्वस्तात बाद झाला. या दोन्ही विकेट्स डेव्हिड विलीने घेतल्या.

मात्र, पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर सलामीवीर निसंका आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सदिरा समरविक्रमा यांनी डाव सावरताना शतकी भागीदारी केली. त्यांनी नंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

दोघांनीही नाबाद अर्धशतके करत श्रीलंकेला 26 व्या षटकात विजयापर्यंत पोहचवले. पाथम निसंका 83 चेंडूत 77 धावा करुन नाबाद राहिला, तर समरविक्रमा 54 चेंडूत 65 धावांवर नाबाद राहिला.

England vs Sri Lanka
World Cup 2023: वॉर्नरची शतक ठोकत सचिनशी बरोबरी, रोहितच्याही विश्वविक्रमाच्या पोहचला जवळ

तत्पुर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही सलामीवीर डेव्हिड मलान 25 चेंडूत 28 धावांवर बाद झाला, तर जॉनी बेअरस्टोही 30 धावांवर बाद झाला.

दरम्यान, एक बाजू सांभाळत बेन स्टोक्स एकाकी झुंज देत होता. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने कोणीही भक्कम साथ दिली नाही. जो रुट (3), कर्णधार जॉस बटलर (8), लियाम लिव्हिंगस्टोन (1), मोईन अली (15), ख्रिस वोक्स (0), आदिल राशिद (2) आणि मार्क वूड (5) हे सर्वच स्वस्तात बाद झाले.

बेन स्टोक्सही 43 धावांवर बाद झाला. त्याचमुळे इंग्लंडचा डाव 33.2 षटकात 156 धावांवर सर्वबाद झाला. डेव्हिड विली 14 धावांवर नाबाद राहिला.

श्रीलंकेकडून लहिरू कुमाराने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच अँजेलो मॅथ्युज आणि कसुन रजिथा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com