Sri Lanka Cricket: श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप! भारताविरुद्धच्या पराभवानंतर संपूर्ण बोर्डाचीच हाकालपट्टी

Sri Lanka Cricket: भारताने श्रीलंकेचा वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 302 धावांनी पराभव केल्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी संपूर्ण बोर्डाचीच हाकालपट्टी केली आहे.
Sri Lanka Team
Sri Lanka TeamICC
Published on
Updated on

Sri Lanka Sports Minister Roshan Ranasinghe Sacks National Cricket Board After defeat Against India in ICC ODI World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत काही संघांची कामगिरी शानदार राहिली आहे, तर काही संघांकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे. 1996 सालचा विश्वविजेत्या श्रीलंकन संघालाही या स्पर्धेत संघर्ष करावा लागला आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचे आव्हानही या स्पर्धेतील संपले आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठा भुकंप झाल्याचे दिसत आहे.

भारताने 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंका संघाचा 302 धावांनी पराभव केल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या हालचाली घडल्याचे दिसले. या सामन्यानंतर श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन राणासिंघे यांनी संपूर्ण राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या कार्यकारी समितीची हाकालपट्टी केली आहे.

मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर राणासिंघे यांनी श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर घणाघात केला होता. त्यानंतर आता असे समोर येत आहे की राणासिंघे यांच्या मंत्रायलाने दिलेल्या स्टेटमेंटनुसार 'क्रीडा मंत्री रोशन राणासिंघे यांनी श्रीलंका क्रिकेटसाठी अंतरिम समिती स्थापन केली आहे.'

Sri Lanka Team
IND vs SL: विराट, गिल, अय्यरची फलंदाजी ते वेगवान आक्रमण; भारताच्या श्रीलंकेविरुद्ध विजयाची 5 कारणे

राणासिंघे यांनी स्थापन केलेल्या अंतरिम समितीचे अध्यक्षपद 1996 वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या समितीमध्ये सात सदस्य आहेत, ज्यात एका निवृत्त न्यायाधिशाचाही समावेश आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच राणासिंघे यांनी संपूर्ण बोर्डातील कार्यकारी समितीच हाटवली आहे.

खरंतर श्रीलंका संघाने भारताविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतरच राणासिंघे यांनी बोर्डातील सर्व सदस्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या पराभवानंतर श्रीलंकन जनतेमध्येही रोष पाहायला मिळाला होता. राणासिंघे यांनी म्हटले होते की श्रीलंका क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांना आपल्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

Sri Lanka Team
World Cup 2023: 'ICC, टीम इंडिया आणि वेगळा बॉल!' पाकिस्तानी क्रिकेटरचा हस्यास्पद दावा अन् आकाश चोप्राची फटाकेबाजी

राणासिंघे यांनी यापूर्वी बोर्ड भ्रष्टाचार करत असल्याचाही आरोप केला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार खेळात राजकीय हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटवर आयसीसीकडून काही कारवाई होईल का, असाही एकाबाजूने प्रश्न उपस्थित होत आहे.

परंतु, याचदरम्यान, मीडियातील काही रिपोर्ट्सनुसार राणासिंघे यांनी आयसीसीला पत्र लिहून पाठिंब्याची आणि समजून घेण्याची विनंती केली आहे.

श्रीलंकेचा झालेला लाजीरवाणा पराभव

2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com